Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आणखी एका टी२० विश्वचषकाचे वाजले बिगुल; अतिमहत्त्वाच्या तारखांचा झाला खुलासा; तुम्हीही वाचा

January 14, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
aus-nz

Photo Courtesy: Twitter/ICC


मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे झालेल्या टी२० विश्वचषकाच्या आठवणी क्रिकेटप्रेमींमध्ये अद्याप ताज्या आहेत. त्याचवेळी आता यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या पुढील टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या विश्वचषकासंबंधी महत्त्वाच्या तारखांचा खुलासा केला. तसेच, आयसीसी लवकरच स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रकही जाहीर करणार आहे. (ICC T20 World Cup 2022)

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार होता. मात्र, जगावर कोरोना महामारीचे संकट आल्याने हा विश्वचषक एक वर्ष पुढे नेत २०२१ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली युएई (ICC T20 World Cup 2021 UAE) येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत हा विश्‍वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर आता चालू वर्षाच्या उत्तरार्धात गतविजेते ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. (T20 World Champion Australia)

महत्त्वाच्या तारखांचा झाला खुलासा
सन २००७ पासून सुरू झालेली टी२० विश्वचषक स्पर्धा आठव्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाईल. या स्पर्धेला १६ ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल व स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. स्पर्धेमध्ये एकूण ७ मैदानांवर ४५ सामने खेळविले जातील. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक २१ जानेवारी रोजी घोषित करण्यात येणार आहे. तर, तिकीट विक्रीला ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात होईल.

या ठिकाणी होणार सामने
ऍडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे सर्व ४५ सामने होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि ऍडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी सुपर १२ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे संघ मुख्य ड्रॉ पूर्वी पात्रता फेरी खेळतील.

महत्त्वाच्या बातम्या-

रमीज राजांनी सुचवलेली ‘ती’ मालिका होणार का? आयसीसी म्हणते… (mahasports.in)

विराटच्या ‘त्या’ वर्तनावर भडकला गंभीर! ‘…तुम्ही कधीच रोल मॉडेल बनू शकत नाही’ (mahasports.in)

साडेसहाशे कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमधून तब्बल ‘७००’ कसोटीपटू, पण १४० कोटी भारतीयांपैकी फक्त ‘३०३’! (mahasports.in)

 


Next Post
South Africa

SAvsIND: केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिका 'विराटसेने'वर भारी! भारताने पराभवाबरोबरच मालिकाही गमावली

atkmb

‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्यास मोहन बागान उत्सुक

Sachin-Tendulkar-MakarSakranti-Wishes

इथे तिथे नव्हे तर गोल्फच्या मैदानावर सचिन तेंडूलकर साजरी करतोय मकरसंक्रांत, बघा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143