---Advertisement---

रोहितपासून ते तेंडूलकरपर्यंत, सर्वांनीच थोपटली रिषभ पंतची पाठ; पाहा दिग्गजांचे खास ट्वीट्स

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 4:06 PM
Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज याने रिषभ पंत (Rishabh pant) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Sa vs Ind 3rd test) अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी ) भारतीय संघ अडचणीत असताना नाबाद शतक झळकावले होते. या खेळीचा जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान या खेळीनंतर अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आला होता. सलग दोन षटकात दोन गडी बाद झाल्यामुळे रिषभ पंतने सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रिषभ पंत फटकेबाजी करत असताना विराट कोहली आरामात फलंदाजी करत होता. परंतु, विराट कोहली बाद होऊन परतल्यानंतर रोहित शर्माने जबाबदारीने फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला.

रिषभ पंतच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. भारतीय संघाचे माजी फलंदाज वसीम जाफर यांनी ट्विटरवर हटके मीम्स शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी या मीम्समध्ये रिषभ पंत आणि इतर फलंदाजांची तुलना केली आहे, तर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी ट्वीट करत लिहिले की, “रिषभ पंतकडून अप्रतिम खेळी. केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी अंक गाठला. एकट्याने भारताला सामन्यात टिकवून ठेवले. भारतीय संघातील सर्वात मोठा सामना जिंकून देणारा खेळाडू.”

 

तसेच माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, “महत्वाच्या क्षणी अप्रतिम खेळी केली रिषभ पंत.” तसेच इरफान पठाणने(Irfan Pathan) देखील टवीत करत त्याचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, “हेच कारण आहे की, आम्ही या खेळाडूबद्दल जास्त बोलतो. या खेळाडूमध्ये सामना बदलण्याचे कौशल्य आहे.”

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या होत्या. यासह दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

…आणि बुमराहला बाद करताच १४५ वर्षांत न झालेला पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला जमा; वाचा सविस्तर

शमीने ‘त्या’ आफ्रिकन फलंदाजाला बनविले ‘बकरा’; मालिकेत दिली नाही स्थिरावण्याची संधी

हे नक्की पाहा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---