इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरणार नाही. ऍशेस 2023चा हा शेवटचा कसोटी सामना असून अष्टपैलूच्या दुखापतीमुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसी फलंदाजी करताना मोईनला कंबरेची दुखापत झाली होती.
द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात असलेला हा शेवटचा कसोटी सामना इंग्लंडसाठी प्रतिष्ठेचा आहे. कारण मालिकेतील पहिल्या चार पैकी फक्त एका सामन्यात यजमान संघाला विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ 1-2 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया, तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. चौता कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. अशात शेवटच्या कसोटीत विजय मिळवून इंग्लंड संघ मालिकेतील पराभव टाळू शकतो. इंग्लंडसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सामन्यात मोईन अलीला कंबरेची दुखापत झाली. याच कारणास्तव तो पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसी क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाहीये. मोईन अली ऍशेस कसोटीच्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडण्याचीही शक्यता पर्तवली जात आहे.
तत्पूर्वी पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा मध्यक्रमातील फलंदाज हॅरी ब्रुक यानेही मोईन अलीच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली. ब्रुक म्हणाला. “मला नाही वाटत की तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. तो उद्या (शनिवारी, 28 जुलै) मैदानात येऊ शकेल, अशी आशा आहे. तो आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्याला जसे खेळायचे होते, तसे प्रदर्शन शक्यतो करू शकला नाही. या मालिकेत मोईन अली आमच्यासाठी खूप महत्वाचा आणि सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिला आहे. तो लवकरच ठीक होईल, अशी आशा आहे.” दरम्यान, ब्रुकला जरी दुसऱ्या दिवशी मोईन खेळण्याची आशा असली, तरी हे शक्य होणार नाहीये.
दरम्यान, इंग्लंडसाठी पहिल्या डावात मोईन अलीने 47 चेंडूत 34 धावांची खेळी केली. हॅरी ब्रुक 91 चेंडूत सर्वाधिक 85 धावांचे योगदान देऊ शकला. यजमान संघ पहिल्या डावात 54.4 षटकांमध्ये 283 धावा करून सर्वबाद झाला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात मिचेल स्टार्कने जबरदस्त प्रदर्शन करत 4 विकेट्स घेतल्या. जोश हेजलवूड आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Ashes 2023 5th test । Moeen Ali will not take the field on day two due to his groin injury.)
महत्वाच्या बातम्या –
नाद नाद नादच! देवधर ट्रॉफीत रियान परागचं वादळी शतक, 11 सिक्स मारत टीकाकारांची बोलती केली बंद
सॅमसनला मिळाली नाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, तरीही पठ्ठ्याने मैदानावर लुटली वाहवा; कसं ते घ्या जाणून