इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने मॅनचेस्टर येथे पावसाच्या शक्यतेविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हेजलवूड म्हणाला आहे की, जर असे घडले, तर त्याच्या संघासाठी खूप चांगले होईल.
खरं तर, ऑस्ट्रेलिया (Australia) संघ चौथ्या कसोटी सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. इंग्लंड (England) संघाने 592 धावांचा भलामोठा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात 113 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. मार्नस लॅब्यूशेन 44 आणि मिचेल मार्श 1 धावेवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया इंग्लंडपासून अद्याप 126 धावा दूर आहे.
‘पाऊस पडल्याने आमचे काम सोपे होईल’
जोश हेजलवूड (Josh Hazlewood) याने तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पावसाच्या शक्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “जर असे घडले, तर मला खूप आनंद होईल. निश्चित याची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र, हवामान नेहमी बदल असते. पाऊस आणि प्रकाश क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशात जर पावसामुळे सामना थांबला, तर आमच्या संघासाठी हे खूप चांगले होईल. यामुळे आमचे काम थोडे सोपे होईल.”
मॅनचेस्टर येथे शनिवारी (दि. 22 जुलै) सुरुवातीचे काही तास 75 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यानंतर दिवसाच्या शेवटीही पाऊस पडू शकतो. मात्र, रविवारी वातावरण स्पष्ट असल्याची आशा आहे. खेळाच्या सुरुवातीलाच फक्त थोडा पाऊस पडू शकतो. ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात पाऊसच वाचवू शकत असल्याचे बोलले जात आहे. संघाला अजूनही मोठा प्रवास करायचा आहे. इंग्लंड संघाने जर हा सामना जिंकला, तर मालिकेत 2-2 अशी बरोबरी होऊ शकते. (ashes 2023 cricketer josh hazlewood expects rain could save australia in 4th test)
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, ती वेळ…’, विक्रमी शतकानंतर काय म्हणाला विराट?
आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video