---Advertisement---

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या सामन्याबद्दल मोठा निर्णय; पर्थमधून सामना तर हलवलाच, आता ‘हा’ बदलही होणार

On: शुक्रवार, डिसेंबर 10, 2021 6:59 PM
Pat-Cummins-and-Joe-Root
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मानाची ऍशेस मालिका खेळत आहे. ही ७२ वी ऍशेस मालिका आहे. ८ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात झाली असून १८ जानेवारीला मालिका संपणार आहे. दरम्यान या मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की, ऍशेस २०२१-२२ मालिकेतील अखेरचा सामना दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. तरी हा सामना नक्की कुठे खेळवला जाणार याबद्दल मात्र, अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खरंतर हा सामना पर्थमध्ये होणार होता. मात्र, पर्थमध्ये क्वारंटाईनचे कडक निर्बंध आहेत, ज्यामुळे १४ ते १८ जानेवारीदरम्यान होणारा हा सामना तेथून हलवून दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण अद्याप नवे ठिकाण निश्चित झालेले नाही. 

गुरुवारी (९ डिसेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले की पाचवा कसोटी सामना जिथेही होईल, तिथे दिवस-रात्र खेळवला जाईल. तसेच त्यांनी असेही सांगितले की, सध्या या कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी अनेक राज्यांनी रस दाखवला आहे. आता याबद्दलही लवकरच निर्णय घेतला जाईल. 

हॉकले यांनी सांगितले की, ‘पर्थमध्ये असलेल्या कठोर क्वारंटाईन नियमांमुळे तिथे पाचवा कसोटी सामना खेळला दाणार नाही. आता हा सामना मेलबर्न, होबार्ट आणि सिडनी या शहरांमध्ये खेळला जाऊ शकतो. कुठेही पाचवा कसोटी सामना खेळला जाऊ शकतो, पण हा सामना गुलाबी चेंडूने (दिवस-रात्र सामना) खेळला जाईल. आम्ही सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आहे. आम्ही बोर्डासमोर विविध विचार मांडले आहेत आणि असं करण्याची शिफारस केली आहे.’

याशिवाय हॉकले यांनी पर्थमध्ये अखेरचा सामना होणार नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली.

या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियममध्ये खेळला गेला. तर, दुसरा सामना १६ ते २० डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे, तर तिसरा सामना २६ ते ३० डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे होणार आहे. तिसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. त्याचबरोबर चौथा कसोटी सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीला ५ ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान सिडनी येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“२०१९ विश्वचषकातील त्या निर्णयाशी मी सहमत नव्हतो”; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

इंग्लिश चाहत्याने जिंकली प्रेमाची मॅच! लाईव्ह ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियन प्रेयसी घातली लग्नाची मागणी, पाहा व्हिडिओ

हरभजनने जागविल्या जुन्या आठवणी! तुम्ही ओळखू शकता का त्याचे ‘हे’ दोन सहकारी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---