इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका (ashes series) बुधवारी (८ डिसेंबर) सुरू झाली. इंग्लंड संघाचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (ben stokes) याने मालिकतील पहिल्या सामन्यातून इंग्लंड संघात पुनरागमन केले. तत्पूर्वी स्टोक्स मागच्या काही महिन्यांपासून मानसिक आरोग्याच्या कारणास्तव विश्रांतीवर होता. स्टोक्सने त्याच्या या पुनरागमन सामन्यात ५६८ या क्रमांकाची एक काळी पट्टी हाताला बांधली होती. चाहत्यांना स्टोक्सने बांधलेल्या या पट्टीविषयी प्रश्न पडला आहे.
त्याने पहिल्या दिवशी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी ही काळी पट्टी बांधली होती. स्टोक्सचे वडील न्यूझीलंड रग्बी संघाचे खेळाडू होते आणि त्यांच्या टोपीचा क्रमांक देखील ५६८ होता. त्यामुळे स्टोक्सने देखील याच क्रमांकाची काळी पट्टी बांधली होती.
स्टोक्ने सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी त्याच्या वहिलांविषयी एक भावूक पोस्टही शेअर केली होती. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘काही महिन्यांपूर्वी मला माहीत नव्हते की, मी पुन्हा कधी मैदानावर जाऊ शकेल की नाही. मला हे खूप हैराण करत आहे की, उद्या जेव्हा मी मैदानावर जाईल, तेव्हा मला तुमची आठवण येत असेल. कारण एक वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला सोडून गेला होतात. तुम्ही या संपूर्ण आठवड्यात माझ्यासोबत असाल.’
दरम्यान, स्टोक्स त्याच्या या पुनरागमन सामन्यात अपेक्षित खेळी करू शकला नाही. स्टोक्स बऱ्याच दिवसांनंतर इंग्लंड संघासाठी खेळणार असल्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, स्टोक्स या अपेक्षांना पात्र ठरू शकला नाही. त्याने या सामन्यात अवघ्या पाच धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली.
स्टोक्सप्रमाणेच इंग्लंड संघाची प्रदर्शन देखील खूपच खराब पाहायाला मिळाले. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांने वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त कॅमरून ग्रीनने देखील एक विकेट घेतली.
इंग्लंडसाठी जॉस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्थशतकी खेळी करता आली नाही. कर्णधार जो रुटकडून सर्वांना अपेक्षा होत्या, पण तो शून्य धावांवर बाद झाला. तसेच सलामीवीर रोरी बर्न्स देखील पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या दिवसाच्या शेवटी इंग्लंड संघ ५०.१ षटकात १४७ धावा करून सर्वबाद झाला आणि पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणांनी विराटला सोडावे लागले वनडे संघाचे नेतृत्व; ‘ते’ स्वप्न राहणार अपूर्ण