भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा सध्या गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या वर्षी नेहमराच्या मार्गदर्शनात गुजरात संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात संघ अंतिम सामन्यात उतरणार आहे. तत्पूर्वी नेहरा आणि त्याच्या संघातील दोन गोलंदाजांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत हे तिघे एकाच दुचाकीवरून मैदानात फिरताना दिसत आहेत.
रविवारी आयपीएल 2023चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याआधी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांचे खेळाडू कसून सराव करत आहेत. यादरम्यानच आशीष नेहरा (Ashish Nehra) मजेशीर अंदाजात दिसला. त्याने मोहित शर्मा (Mohit Sharma) आणि राशिद खान (Rashid Khan) यांना दुचाकीवर बसवून मैदानात चक्कर मारली. शनिवारी (28 मे) जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
https://www.instagram.com/reel/CswCEgHrJ-c/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी नुकतेच आशीष नेहमराचे कौतुक केले आहे. गुजरात टायटन्सला आयपीएलमध्ये मिळत असलेल्या यशात नेहमचा मोठा वाटा आहे, असे गावसकरांना वाटते. नेहरा म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील हुशार व्यक्तिमत्व असल्याचा उल्लेख यावेळी केला. एका वृत्तामाध्यावर बोलताना गावसकर म्हणाला, “मी आशिष नेहराला मिस नही करणार. जेव्हा तो कॅमेंट्री बॉक्स किंवा चेंजिंग रूमच्या आसपास असतो, तेव्हा त्याठिकाणचे वातावरण मजेशीर असते. तुम्ही त्याच्या जवळ असताना हसल्याशिवाय थांबू शकत नाही. नेहरा नेहमी बाउंड्री लाईच्या असपास उभा राहून खेळाडूंना इनपूट देतानाही दिसतो.”
दरम्यान, आयपीएलच्या या अंतिम सामन्यात राशिद खान याने 27, तर मोहित शर्मा यांनी 24 विकेट्स घेतल्या आहेत. हंगामात सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत हे दोघे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचाच मोहम्मद शमी आहे. शमीने या आयपीएल हंगामात आतापर्यंत एकूण 28 विकेट्स घेतल्या आहेत. (Ashish Nehra, Mohit Sharma and Rashid Khan to play triple seat on two-wheeler before final match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कपिल पाजींची शुबमन गिलला वॉर्निंग! म्हणाले, ‘सचिन-विराटच्या दर्जाचा नाही, फॉर्म गेल्यावर…’
BREAKING: नव्या संसदेसमोर आंदोलक कुस्तीपटूंना फरफटले, देशभरात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया






