Rohit Sharma – Virat Kohli :- टी20 विश्वचषक 2024 नंतर दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपातून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु हे दोन्ही खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहेत. मात्र दोघांचे वय पाहता ते 2027 च्या वनडे विश्वचषकात खेळतील की नाही? असा प्रश्न क्रिकेटरसिक उपस्थित करत आहेत. आता यावरुन माजी भारतीय गोलंदाज आणि गुजराय टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा याने आपले मत मांडले आहे.
रोहित (37 वय)-विराट (35 वय) यांचे वनडे विश्वचषक 2027 मध्ये खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे मत माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने व्यक्त केले आहे. मात्र, शुंबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन कदाचित त्यांची जागा घेऊ शकतात, असेही त्याने सांगितले.
‘स्पोर्ट्स तक’शी संवाद साधताना आशिष नेहरा म्हणाला, “खेळाडूंनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्त्वाचे आहे. तुमच्यात किती उत्कटता आणि प्रेरणा आहे यावर अशा गोष्टी अवलंबून असतात. रोहित आणि कोहलीत याची कमतरता नाही. त्यांना आवड आहे त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन चांगल्या धावा करतील आणि या दोन्ही खेळाडूंना पुश करतील. या कारणास्तव विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना त्यांच्या खेळाची पातळी वाढवत राहावी लागेल. या दोघांनी यापूर्वीही असे केले आहे.”
आशिष नेहरा पुढे म्हणाला, “2027 अजून दूर आहे. पण जर तुम्ही मला विचाराल तर, मला कायम 18 वर्षांचा राहायला आवडेल. मला निवृत्त व्हायचे नाही. जर तुम्ही गंभीरला ही संधी दिली आणि म्हणालात तुझे शरीर फिट असल्याचे सांगितले तर तो म्हणेल सुदर्शनला सोड, मी तयार आहे. चार वर्षे हा बराच काळ आहे, पण तो विलक्षण आहे. असे झाले तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने विश्वचषक खेळू नये, तो बेशुद्ध पडेल; माजी भारतीय क्रिकेटरनेच ‘हिटमॅन’ला हिणवले!
टीम इंडियापासून वेगळे होताच राहुल द्रविडला मिळाली मोठी जबाबदारी, आता या भूमिकेत दिसणार