भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या तुलनेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “पंतला धोनीचा बदली खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. परंतु हा युवा खेळाडू तर न्यूझीलंड दौऱ्यावर वॉटर बॉय म्हणून खेळाडूंना पानी देताना दिसला होता. त्यामुळे दोघांची तुलना करणे योग्य नाही.”
तसेच नेहराने कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे सामन्यांकडे लक्ष न दिल्यामुळे त्याच्यावरही टीका केली आहे.
नेहराने एका रेडिओ कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राबरोबर (Aakash Chopra) झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले की, “संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंना पाठिंबा दिला पाहिजे. ज्याप्रकारे न्यूझीलंडमध्ये (New Zealand) ५ टी२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यात रिषभ पंतला संधी मिळाली नव्हती, हे खूप वाईट होते. तो इतर खेळाडूंना पाणी देताना दिसला होता. अशामध्ये तो धोनीचा बदली खेळाडू म्हणून कसा खेळाडू बनेल?”
तसेच विराटबद्दल बोलताना नेहरा (Ashish Nehra) म्हणाला की, “हे वर्ष टी२० क्रिकेटचे आहे, विराटच्या या मताशी मी सहमत नाही. जेव्हा वनडेमध्ये विजय मिळवण्यावर तुमच्यावर लक्ष नव्हते, तेव्हा तुम्ही का खेळला. विजयानंतर तुम्ही असे बोलता तेव्हा समजू शकतो. परंतु पराभूत झाल्यावर अशाप्रकारचे वक्तव्य करणे चूकीचे आहे. यामुळे संघाच्या प्रयत्नांंवर प्रश्न उपस्थित होतो.”
“भारतीय संघाच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये २००० नंतर बदल झाला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत आपल्याला खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपण त्यांच्यापासून अजूनही खूप दूर आहोत. ऑस्ट्रेलियाने (Australia) ३ सलग विश्वचषक जिंकले आहेत. १९९६मध्ये अंतिम सामन्यात पोहोचला आहे. सलग १८-१९ कसोटी सामने मायदेशात आणि परदेशात जिंकले आहेत. ही भारतीय टीम तेथे पोहोचू शकत नाही असं नाही पण एक मुख्य संघ खूप महत्वाचा आहे असा माझा विश्वास आहे,” असेही नेहरा यावेळी म्हणाला.
नेहरा पुढे म्हणाला की, “मी विराटच्या नेतृत्वाबद्दल फार काही बोलणार नाही. कारण मी त्याच्या नेतृत्वात फार क्रिकेट खेळलो नाही. परंतु माझा असा विश्वास आहे की, विराटच्या नेतृत्वामध्ये आणखी सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. विराटला एक खेळाडू म्हणून कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. कारण त्याची आकडेवारी सर्वकाही दर्शवते. खेळाडू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-जुन्या आठवणींना उजाळा देणारा गांगुलीने शेअर केला लॉर्ड्सवरील ‘हा’ खास फोटो
-जखमी अवस्थेत असतानाही संघहितासाठी मैदानात उतरलेले ५ क्रिकेटपटू
-लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच फस्त!