न्यूझीलंडच्या दौऱ्यातील पहिल्या वनडेमध्ये आश्वासक खेळी करणारा भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याला दुसऱ्या सामन्यात बाकावर बसवले गेले. आणि भारताचा कर्णधार शिखर धवन याच्या या आश्चर्यकारक निर्णयावर चाहत्यांनी टीकांचा भडीमार केला. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय संघ व्यवस्थापनावर टीकास्त्र डागले. भारतीय कर्णधार शिखर धवन याने केवळ गोलंदाजी बळकट करण्यासाठी संजूला वगळून दीपक हुडा याला संधी दिली गेल्याचे म्हटले. त्याचवेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने देखील आता भारतीय संघाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजूला दुसऱ्या सामन्यात संध्या जागा न मिळाल्याने आशिष नेहरा हा देखील निराश झाला. त्याने म्हटले,
“तुम्ही दीपकला संधी दिली याचा अर्थ हा नक्कीच आहे की तुम्ही गोलंदाज मजबूत करत आहात. कारण, या आधीच विश्वचषक खेळलेल्या दीपकला तुम्ही बाकावर बसवले होते. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला तुम्ही खेळवले. माझ्यासाठी संजू आधीपासूनच संघाचा भाग आहे.”
संजू सॅमसन (Sanju Samson) याच दौऱ्यावरील झालेल्या टी20 मालिकेच्या एकाही सामन्यात खेळला नाही. तेव्हाचा भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही कारण सांगितले होते. त्याने म्हटले की त्याला संधी न मिळणे हे खरच निराशाजनक आहे. जर मालिका तीन पेक्षा अधिक सामन्यांची खेळली गेली असती तर नक्कीच त्याला संघात घेतले असते. ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अंतिम अकरामध्ये जागा मिळाली. त्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 36 धावा केल्या, त्याचबरोबर श्रेयस अय्यर याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केलेली. तरीही दुसऱ्या सामन्यातून त्याला वगळले गेले.
(Ashish Nehra Slams Team Management For Not Picking Sanju Samson)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या माजी दिग्गजाने पुन्हा साधला भारतावर निशाणा, धवन- लक्ष्मणच्या निर्णयावर म्हणाला…
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा