---Advertisement---

Video: त्या फलंदाजाने एक धाव घेताच संघसहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या, जाणून घ्या कारण

On: रविवार, एप्रिल 28, 2019 5:21 PM
---Advertisement---

जयपूर। शनिवारी(27 एप्रिल) आयपीएल 2019 चा 45 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने 7 विकेट्सने विजय मिळवला असून स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.

या सामन्यात राजस्थानच्या विजयात जयदेव उनाडकटने 26 धावांत 2 विकेट्स घेऊन तर फलंदाजीत लियाम लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूत 44 आणि संजू सॅमसनने 32 चेंडूत नाबाद 48 धावा करत मोलाचा वाटा उचलला. पण या तिघांबरोबरच फक्त नाबाद 3 धावा करुनही ऍश्टन टर्नर या सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता.

याचे कारण असे की या सामन्याआधी टर्नर मागील पाच ट्वेंटी20 डावात सलग शून्य धावेवर बाद झाला आहे. त्यामुळे ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सलग 5 डावात शून्य धावेवर बाद होणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता. पण हैद्राबाद विरुद्ध भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पहिली धाव काढल्यानंतर त्याने ही शून्य धावेवर बाद होण्याची मालिका अखेर खंडीत केली.

त्याने 17 व्या षटकातील भुवनेश्वरने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर फ्लिक करत डिप स्क्वेअर लेगला चेंडू फटकावला आणि एक धाव काढली. त्याने ही धाव काढली तेव्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या त्याच्या संघसहकाऱ्यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. यावेळी हे सर्व पाहुन त्यालाही हसू आले. तसेच गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरलाही हसू लपवता आले नाही.

या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना मनिष पांडेने केलेल्या 61 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 160 धावा केल्या. त्यानंतर 161 धावांचे आव्हान राजस्थानने 19.1 षटकात सहज पार केले.

https://twitter.com/GeorgeLawrnce/status/1122368515661393920

महत्त्वाच्या बातम्या –

जिंकली राजस्थान रॉयल्स पण फायदा झाला चेन्नई सुपर किंग्सला

हार्दिक पंड्याने हिटमॅनला दिला अ‍ॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याचा सल्ला

इंग्लंडला परतण्यापूर्वी बेन स्टोक्सचा राजस्थान रॉयल्सला भावनिक गुडबाय, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment