---Advertisement---

23 वर्षीय अश्निनीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

On: मंगळवार, एप्रिल 1, 2025 9:06 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात, 23 वर्षीय अश्विनी कुमारने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि त्याच्या आयपीएल पदार्पणात अशा पद्धतीने गोलंदाजी केली जी क्वचितच पाहायला मिळते. त्याने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेऊन खळबळ उडवून दिली. प्रथम फलंदाजी करताना केकेआरचा संघ 116 धावांवर सर्वबाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अश्विनी कुमारने तीन षटकांत 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या पदार्पणात चार विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी, कोणत्याही भारतीय खेळाडूला आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेता आल्या नव्हत्या. आता वयाच्या 23 व्या वर्षी त्याने उत्तम काम केले आहे.

अश्विनी कुमारने त्याच्या आयपीएल पदार्पणाचा पहिला चेंडू अजिंक्य रहाणेला टाकला आणि त्याच चेंडूवर त्याने एक विकेट घेतली. यानंतर त्याने रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या मधल्या फळीला गार केले. अश्विनीविरुद्ध केकेआरच्या फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाहीत.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अश्विनी कुमारला मुंबई इंडियन्स संघाने 30 लाख रुपयांना खरेदी केले. यापूर्वी तो पंजाब किंग्ज संघाचाही भाग होता, पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. देशांतर्ग क्रिकेटमध्ये तो पंजाबकडून खेळतो आणि आतापर्यंत त्याने दोन प्रथम श्रेणी सामने आणि चार लिस्ट-ए सामने खेळले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---