भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात ३२९ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताने इंग्लंडची दुसऱ्या डावात ६ बाद १०३ अशी नाजूक अवस्था केली आहे.
फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. विशेषतः अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनने बहारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना तीन बळी पटकाविले. या तीन बळींमधील बेन स्टोक्सच्या बळीची सर्वाधिक चर्चा झाली.
पारंपारिक ऑफस्पिनने केले त्रिफळाचीत
इंग्लंडच्या डावात पहिल्या षटकापासूनच भारताने बळी मिळवायला सुरुवात केली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस ४ बाद ३९ अशी इंग्लंडची अवस्था झाली होती. मात्र त्यांचा अष्टपैलू बेन स्टोक्स एका बाजूने खिंड लढवत होता. तसेच दुसऱ्या सत्रात फटकेबाजी करून भारतासाठी तो डोकेदुखी ठरण्याचीही चिन्हे होती. मात्र यावेळी आर अश्विन भारतासाठी धावून आला.
अश्विनने २४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. अश्विनने ड्रिफ्ट दिलेला चेंडू हवेतून आत आला आणि टप्पा पडल्यावर फिरकी घेऊन थेट स्टंपवर गेला. चेंडू एवढा फिरेल अशी अपेक्षा नसल्याने चुकीच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करत असलेला स्टोक्स अश्विनच्या जाळ्यात अलगद फसला. अश्विनच्या या दर्जेदार विकेटचा व्हिडिओ सोशल मिडीयावर देखील वेगाने व्हायरल होतो आहे.
https://twitter.com/KirketVideoss/status/1360846019026649093?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1360846019026649093%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket-r-ashwin-bold-ben-stokes-magic-ball-india-vs-england-2nd-test-day-2-watch-video-772285
दरम्यान, स्टोक्सच्या या विकेटसह अश्विनने काही महत्वाचे विक्रमही आपल्या नावे केले. स्टोक्सची विकेट अश्विनची भारतीय भूमीवरील २६६वी विकेट ठरली. यासह भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानी पोहोचला. तसेच जानेवारी २०१५ पासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही तो अव्वल स्थानी पोहोचला. भारताला ही कसोटी आणि मालिका जिंकायची असल्यास, अश्विनचा हा फॉर्म कायम राहणे गरजेचे असेल.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडचा संघ अवघ्या दिडशे धावसंख्येवर होणार ऑलआऊट; दिग्गजाने केली भविष्यवाणी
INDvsENG 2nd Test Live : बेन फोक्स आणि मोईन अलीची सावध खेळी, इंग्लंडचे धावांचे शतक पूर्ण
आले तसे गेले..! भारत-इंग्लंडचे सलामीवीर भोपळाही न फोडता माघारी, तब्बल ३४ वर्षांनंतर घडलं असं