भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (Mohali test) खेळला जात आहे. हा सामना आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत (ICC Test Championship) खेळवला जात असल्याने उभय संघांसाठी हा साना जिंकणे महत्त्वपूर्ण होते. परंतु यजमान भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या दिवशीपासूनच सामन्यावर पकड बनवायला सुरुवात केली. परिणामी पिछाडीवर असलेल्या पाहुण्या श्रीलंका संघाची तिसऱ्या दिवसापर्यंत दुर्दशा झाली.
श्रीलंकेच्या संघाला पिछाडीवर ढकलण्याचे काम केले भारताचे फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी. त्यातही अश्विनने या सामन्यादरम्यान ५ विकेट्स घेतल्या. यासह त्याने कसोटीतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अश्विनने अशा घेतल्या विक्रमी ५ विकेट्स
भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला विशेष प्रदर्शन करता आले नाही. त्यांची सलामी जोडी केवळ ४८ धावांवर तुटली. अश्विनने श्रीलंकेचा सलामीवीर लहिरू थिरीमाने याला वैयक्तिक १७ धावांवर पायचित करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर नुकताच फलंदाजीला आलेला धनंजया डि सिल्वाला त्याने एका धावेवर आपला शिकार बनवले. या डावात तो दोनच विकेट्स घेऊ शकला.
त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात १७४ धावांवर गारद झालेल्या श्रीलंकेला फॉलोअप दिला. त्यामुळे पुढील डावात अश्विनने अजून २ विकेट्स घेतल्या. सर्वप्रथम त्याने सलामीवीर लहिरू थिरिमानेला शून्य धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने पथुम निसांकाला ६ धावांवर पव्हेलियनला पाठवले. पुढे चरिथ असलांकाची विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली. त्याने असलांकाला विराट कोहलीच्या हातून २० धावांवर झेलबाद केले.
हेही वाचा- अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी
अश्विनने कपिल देव यांना (R Ashwin Surpasses Kapil Dev) टाकले मागे
अशाप्रकारे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेत अश्विनने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत कपिल देव (Kapil Dev) यांना मागे टाकले आहे. अश्विन आता भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज (India’s Second Highest Test Wicket Taker) बनला आहे. सध्या त्याच्या खात्यात ४३५ कसोटी विकेट्सची नोंद आहे. तर कपिल देव यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान ४३४ विकेट्स घेतल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे अव्वलस्थानी आहेत. त्यांच्या नावावर कसोटीत सर्वाधिक ६१९ विकेट्स आहेत. (Ashwin goes past Kapil Dev to become India’s second-highest wicket-taker in Tests)
Ashwin picks up his 435th scalp and goes past Kapil Dev to become India’s second-highest wicket-taker in Tests 🌟#WTC23 | #INDvSL | https://t.co/mo5BSRmFq2 pic.twitter.com/tHn0PqPvEU
— ICC (@ICC) March 6, 2022
अश्विन बनला भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी फिरकीपटू
तसेच ४३५ विकेट्सचा आकडा गाठत अश्विन कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू ठरला आहे. तर तो जगातील चौथा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा फिरकीपटूही बनला आहे. या यादीत मुथैय्या मुरलीधरन ८०० विकेट्ससह अव्वलस्थानी आहे. तर शेन वॉर्न ७०८ विकेट्स आणि अनिल कुंबळे ६१९ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज
‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक
क्या बात! पुन्हा एकदा भारतापुढे पाकिस्तानला टेकावे लागले गुडघे, १०० टक्के विजयाचा रेकॉर्ड अबाधित