---Advertisement---

आर अश्विन झाला ‘तीस हजारी’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा चौथाच भारतीय

On: रविवार, मार्च 6, 2022 3:38 PM
R-Ashwin
---Advertisement---

श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध ( IND vs SL Test Match) कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज आर आश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा विश्वविक्रम केला आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे सुरू आहे. या सामन्यादरम्यान अश्विनने ३० हजार चेंडू टाकण्याचा विक्रम पूर्ण केला. 

तो शनिवारी (५ मार्च) भारत आणि श्रीलंका पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजारांहून अधिक चेंडू टाकणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने मोहाली कसोटी दरम्यान पहिल्या डावात ही कामगिरी केली आहे.

अश्विनच्या अगोदर अनिल कुंबळेने ५५, २२६ चेंडू टाकले आहेत, तर हरभजन सिंगने ४१, ५५१ आणि कपिल देव यांनी ३८,९४२ चेंडू टाकले आहेत. भारतीय संघासाठी ३० हजारांहून अधिक चेंडू टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता चौथ्या खेळाडूची भर पडली आहे तो म्हणजे आर अश्विन. त्याने हा सामना त्याच्या कारकिर्दीतील ८५ वा कसोटी खेळला असून त्याने ऐकूण २४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

मोहाली कसोटीपूर्वी अश्विनने २४८ अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २९, ९६० चेंडू टाकले होते. शनिवारी (५ मार्च) त्याने आपल्या ७ व्या षटकाचा ४ था चेंडू टाकला आणि त्याने आपल्या कारकिर्दीतील ३० हजार चेंडू पूर्ण केले.

कपिल देव यांना टाकले मागे
पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावात अश्विनने ३ विकेट्स पूर्ण करताच कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४३५ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने कपिल देव यांना सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे. कपिल देव यांच्या नावावर ४३४ कसोटी विकेट्स आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. त्यांनी ६१९ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे, बनला भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज

आई ती आईच! कट्टर प्रतिस्पर्धीला भिडण्याच्या तणावातही नाही विसरली मातृत्त्व, लेकीला घेऊन पाकिस्तानची कर्णधार मैदानात

राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---