शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून त्यांचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग आणखी कठीण केला आहे. या सामन्यात अनेक रोमांचक गोष्टी घडल्या. ज्यापैकी एक गोष्ट म्हणजे, आर अश्विनचा कृणाल पंड्याच्या चेंडूवर विजयी षटकार.
तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरू असताना शेवटचे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर कृणाल पंड्याने षटकार मारत डावाचा शेवट केला होता. परंतु सर्वांना माहीतच आहे की, आर अश्विनसोबत पंगा घेणे किती महागात पडू शकते. तो प्रत्युत्तर देताना मागे पुढे पाहत नाही. हे या स्पर्धेत अनेकदा पाहायला मिळाले आहे. असेच काहीसे या सामन्यात देखील पाहायला मिळाले होते.
शेवटी आर अश्विनला कृणाल पंड्याचा सूड घेण्याची संधी मिळालीच. दिल्ली कॅपिटल्स संघाचे ६ फलंदाज माघारी परतल्यानंतर आर अश्विनने श्रेयस अय्यरसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने २१ चेंडूंमध्ये नाबाद २० धावांची खेळी केली. दरम्यान शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४ धावांची आवश्यकता होती. तर आर अश्विन स्ट्राइकवर होता. त्यावेळी रोहित शर्माने कायरोन पोलार्ड ऐवजी कृणाल पंड्याला शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. यासह अश्विनला बदला घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. याचा फायदा घेत, अश्विनने पहिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारत दिल्ली कॅपिटल्स संघाला सामना जिंकून दिला.
इथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/243042/m46-mi-vs-dc-ravichandran-ashwin-six
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ३३ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने १९ आणि हार्दिक पंड्याने १७ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ८ बाद १२९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून श्रेयस अय्यरने नाबाद ३३ तर रिषभ पंतने २६ आणि आर अश्विनने नाबाद २० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पृथ्वी लक्ष कुठं आहे, बॉल तर इथं आहे’, काळा चष्मा घातलेल्या क्षेत्ररक्षक शॉचा उडाला गोंधळ
‘बचना ए हसीनों, दुबे आ गया’, सीएसकेला धू धू धुणाऱ्या शिवमला चाहत्यांचे हटके चीयर; व्हिडिओची चर्चा
सॅमने टाकला ‘मून बॉल’, तर चेंडूला हवेत फटकावण्यासाठी फिलिप्स खूपच पळाला; पाहा मजेशीर व्हिडिओ