विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाबाबत दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची स्थिती कशी होती हे त्याने सांगितले आहे. अश्विनच्या म्हणण्यानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि हे पाहून खूप वाईट वाटले.
2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि यासोबतच त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या संघाने सलग 10 सामने जिंकले होते मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वचषक विजेतेपद पटकावण्याचे संघाचे स्वप्न अधुरे राहिले. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पराभूत होत आहे. दबावाखाली संघ विखुरतो. 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही हेच पाहायला मिळाले.
एस बद्रीनाथ ( S Badrinath) यांच्याशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आर अश्विन (Ravichandran Ashwin) याने अंतिम फेरीतील पराभवानंतर संघातील वातावरणाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “अर्थात आम्ही खूप दुःखी होतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) रडत होते. हे पाहून मला आणखीनच वाईट वाटले. हा संघ खूप अनुभवी होता आणि प्रत्येकाला काय करावे हे माहित होते. हा एक व्यावसायिक संघ आहे. माझ्या मते या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी शंभर टक्के योगदान दिले. भारतीय क्रिकेटवर नजर टाकली तर प्रत्येकजण एमएस धोनी (Ms Dhoni) याला सर्वोत्तम कर्णधार म्हणतो. परंतु रोहित शर्मा देखील खूप चांगला माणूस आहे. तो संघातील प्रत्येक खेळाडूला चांगला समजतो. प्रत्येकाला काय आवडते आणि काय नाही हे त्याला माहीत असते. तो प्रत्येक खेळाडूबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.” (Ashwin reacts to team atmosphere after World Cup final defeat Said Rohit and Virat a lot)
महत्वाच्या बातम्या
बुमराह आयपीएलमध्ये गुजरात संघाचा कर्णधार होण्याचा विचार करतोय! दिग्गज क्रिकेटरचे भाष्य
T20 World Cup 2024 स्पर्धेत खेळणार रोहित आणि विराट? दिग्गज म्हणाला, ‘IPLमधून…’