सध्या इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असलेल्या भारतीय संघाने मालिकेतील दुसरा सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व चाहते व समीक्षक भारतीय संघाचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी, काहींनी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान का दिले गेले नाही, याबाबत प्रश्न विचारले होते. आता स्वतः आश्विनने पुढे येत या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
…म्हणून लॉर्ड्स कसोटीला मुकलो
रविचंद्रन अश्विन याने संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्याशी गप्पा मारल्या. लॉर्ड्स कसोटीत तू का संघाचा भाग नव्हता? असा प्रश्न विचारल्यानंतर अश्विन म्हणाला,
“खरं सांगायचं झालं तर मला या कसोटीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले होते. कारण, त्या वेळी हवेत बऱ्यापैकी उष्णता होती. परंतु, सामना सुरु होण्यापूर्वी अचानक पाऊस आल्याने हवेत गारवा निर्माण झाला. त्यावेळी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच की कदाचित मला संघाबाहेर बसावे लागेल.”
या मुलाखतीत अश्विन व श्रीधर यांनी भरपूर मजामस्ती केली.
पहिल्या कसोटीतही होता संघाबाहेर
मालिकेतील नॉटिंघम येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही अश्विनला संघात स्थान मिळाले नव्हते. त्या संघ व्यवस्थापनाने मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याला संधी दिलेली. गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अश्विनने आपला अखेरचा कसोटी सामना जून महिन्यात खेळला होता. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केलेली.
भारतीय संघाची मालिकेत आघाडी
लॉर्ड्स कसोटी जिंकत भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली असून, हेडिंग्ले येथे होणारी तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, यजमान इंग्लंड पराभव विसरून मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. हा सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकासाठी संघ निवडताना निवडसमितीला करावी लागणार तारेवरची कसरत, आहेत ‘इतके’ पर्याय
धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर चोरीचा आरोप, होऊ शकते पोलिस कारवाई