भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे खेळला गेला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आर अश्विन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताला विस्मरणीय विजय मिळवून दिला. बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात अय्यर आणि अश्विन यांनी नाबाद 71 धावांची भागीदारी केली आणि भारताला 3 विकेटने विजय मिळवून दिला. भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0ने जिंकली. यादरम्यान अश्विन आणि श्रेयसने भारताच्या कसोटी इतिहासातील 90 वर्ष जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केली. या इतिहासाबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मीरपूर कसोटी सामन्यात भारताने एकेवेळी आपल्या 7 विकेट 74 धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा आर अश्विन (R. Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या जोडीच्या प्रदर्शनावर होत्या. संघाला अडचणीतून काढण्याची जबाबदारी या दोघांवर होती. अश्विन आणि अय्यर यांनी देखील चाहत्यांना निराश केले नाही. त्यांनी भारताला विजय मिळवून दिला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात आठव्या विकेटसाठी केलेली ही दुसरी सर्वश्रेष्ठ भागीदारी होती.
भारताने 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी भारतातर्फे चौथ्या डावात लाल सिंग (Lal Singh) आणि अमर सिंग (Amar Singh) यांनी आठव्या विकेटसाठी 74 धावा केल्या होत्या. या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 189 धावांवर गडगडला होता आणि दुसऱ्या डावात भारतीय संघाला 187 धावा करता आल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात 275 धावांवर आपला डाव घोषीत केला. मात्र, या कसोटी सामन्यात भारताला 158 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भारताने 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 7 विकेट गमावत हा साामना जिंकला. अश्विन यानेे 62 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या तर श्रेयस अय्यर याने 46 चेंडूत 29 धावा करत नाबाद राहिला. या विजयामुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या आशा बळावल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..
या सम हाच! विरोधी खेळाडूचे कौतुक करत विराटने गिफ्ट केली स्वतःची जर्सी; सर्वत्र होतेय कौतुक