दुबई। 23 सप्टेंबरला एशिया कप 2018मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने सहज विजय मिळवला.
या विजयात रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी शतके करत महत्त्वाची कामगिरी केली. रोहित आणि शिखरने मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची द्विशतकी भागीदारीही रचली आहे.
या बरोबरच रोहितने या सामन्यात अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे. त्याने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारताना वनडे क्रिकेटमधील 19 वे शतक झळकावले आहे.
रोहितने केलेले काही खास विक्रम-
1. रोहित वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा 9 वा भारतीय फलंदाज. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने असा पराक्रम केला आहे.
2. वनडेत सर्वात जलद 7000 धावा करण्याच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला 150 डावांसह अव्वल स्थानावर.
वनडेमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारे फलंदाज-
150 डाव: हाशिम आमला
161 डाव: विराट कोहली
166 डाव: एबी डिविलियर्स
174 डाव: सौरव गांगुली
181 डाव: रोहित शर्मा#म #मराठी #AsiaCup2018 #INDvsPAK @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain— Pranali Kodre (@Pranali_k18) September 23, 2018
3. रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेत 5000 धावांचाही टप्पा पार केला आहे. असे करणारा तो फक्त चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग या सलामीवीरांनी हा कारनामा केला आहे.
4. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचाही टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 301 डावात 301 षटकार मारले आहेत.
5. रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 षटकार मारणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच भारतीय फलंदाज. धोनीने 342 षटकार मारले आहेत.
6. शिखर धवनबरोबर 210 धावांची पहिल्या विकेटसाठी केलेली भागीदारी ही एशिया कपमधील भारतीय सलामी जोडीने केलेली सर्वाधिक धावांची भागीदारी.
7. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 13 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागचा 12 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम मागे टाकला आहे.
या यादीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडी अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी 21 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी सलामीला खेळताना केली आहे.
पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा 100 + धावांची भागीदारी-
21 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली
16 – अॅडम गिलख्रिस्ट – मॅथ्यू हेडन
15 – गोर्डन ग्रिनिज – डेसमोन्ड हॅइन
13 – रोहित शर्मा – शिखर धवन
12 – सचिन तेंडुलकर – विरेंद्र सेहवाग#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain
— Pranali Kodre (@Pranali_k18) September 23, 2018
महत्वाच्या बातम्या –
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर