मुंबई |आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा होणार आहे. ही स्पर्धा युएईमध्ये १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात होणार आहे.
मुंबईला बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. यानंतर संघाची घोषणा होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात वनडे सामन्यात खेळलेल्या कोणकोणत्या खेळाडूंना या दौऱ्यात संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वनडेतून वगळण्यात आलेल्या मनिष पांडेने चौरंगी मालिकेत जबरदस्त कामगिरी करत पुन्हा संघाचे दरवाजे ठोठावले आहेत.
विराट कोहली हा सध्या पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तो या मालिकेत खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. तो जर या मालिकेत खेळला नाही तर संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे दिली जाणार आहे.तसेच विराट गेला अडीच महिना सतत क्रिकेट खेळत आहे. तसेच पुढील ३ महीन्यात संघ जवळपास ६ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे विराट या मालिकेत विश्रांतीलाच प्राधान्य देईल असे बोलले जात आहे.
मयांक अग्रवाल आणि अंबाती रायडू ह्या दोन खेळाडूंनाही या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या अग्रवालला जर संघात घेतले तर त्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला अंबाती रायडूनेही चौरंगी लढतीत चांगली कामगिरी केली आहे.
धोनीबरोबर रिषभ पंतची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दिनेश कार्तिकला इंग्लंड दौऱ्यातही केवळ एकच सामना खेळायला मिळाला होती. पंतला संधी दिली तर कार्तिकचे संघाबाहेर होणे जवळपास निश्चित आहे.
महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने यापुर्वीच योयो टेस्ट पास केली आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू गेले काही महिने संघाबाहेर होता. त्यामुळे दुखापतीमुळे जर खेळाडू संघाबाहेर गेला तर तो फिट झाल्यावर त्याला संघात पुन्हा घ्यायचे ही नवी पाॅलीसी आता कशी काम करेल हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
वेगवान गोलंदाजीची धुरा अपेक्षेप्रमाणे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असेल. तसेच या वेगवान गोलंदाजांना बॅकअप म्हणुन शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि सिद्धार्थ कौलमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे.
जर भारताचा दुसऱ्याच फळीतील संघ पाठवायचा ठरला तर दिपक चहर, कृणाल पंड्या, मयांक अग्रवाल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, हनुमा विहारी, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, सिद्धार्थ कौल, वाॅशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या खेळाडूंमध्ये जौरदार चुरस दिसणार आहे.
या खेळाडूंना मिळु शकते विश्रांती-
विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, हार्दिक पंड्या
या स्पर्धेसाठी टीम इंडिया अ गटात समावेश करण्यात आलेला असून भारतासमावेत पाकिस्तानही या गटात असणार आहे. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
– टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…
– ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले
– अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील