fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यातगुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा  केल्या आहेत.

मालितील चौथ्या सामन्यात भारताने आजपर्यंत कधीही केला नाही असा एक कारनामा केला. एकाच कसोटी मालिकेत ५ भारतीय गोलंदाजांनी १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या ७ गोलंदाजांमध्ये पहिले ५ भारतीय गोलंदाज आहेत. त्यात इशांतने सर्वाधिक १३ तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि आर आश्विनने प्रत्येकी १० विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच एकाच कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी ५ विकेट्स घेण्याची देखील ही पहिलीच वेळ होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

एशियन गेम्स: 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण तर पुरूषांना रौप्यपदक

एशियन गेम्स: भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक

You might also like