संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष सध्या आशिया चषक २०२२ वर आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत या स्पर्धेला प्रारंभ होईल. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात दुबईत आशिया चषकाचा उद्घाटन सामना खेळला जाईल. तत्पूर्वी मंगळवारी (०८ ऑगस्ट) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला जागा दिली गेली नाही.
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह (Jasprit Bumrah) आशिया चषकात (Asia Cup) खेळू शकणार नाही. परंतु भारतीय संघाला त्याची जास्त उणीव भासणार नाही. कारण त्याची कमतरता भरून काढणारा एक खेळाडू भारतीय संघात (Team India) उपलब्ध आहे. तो खेळाडू आहे, हार्दिक पंड्या.
बुमराह भारतीय संघाचा अव्वल गोलंदाज असून त्याची दुखापत भारतीय संघासाठी झटक्यापेक्षा कमी नसेल. यंदा दुसऱ्यांदा आशिया टी२० स्वरूपात होत आहे. यापूर्वी २०१६ साली बांगलादेशात आशिया चषक पहिल्यांदा टी२० स्वरूपात खेळला गेला होता. या हंगामात भारताकडून वेगवान गोलंदाज बुमराहने ६ विकेट्स घेतल्या होत्या. ५ सामने खेळताना ५.२२ च्या इकोनॉमीने त्याने या विकेट्स काढल्या होत्या. यादरम्यान २७ धावांवर २ विकेट्स हे त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिले होते. तो या हंगामात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आशिष नेहरासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर होता.
तर वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या यादीत अव्वलस्थानी अर्थात बुमराहच्याही पुढे होता. हार्दिकने ५ सामने खेळताना सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या होत्या. ५.८८ च्या इकोनॉमीने ८ धावा देत ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यामुळे हार्दिक नक्कीच आशिया चषकात बुमराहची कमी जाणवू देणार नाही.
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (टी२० स्वरूपात)-
१. हार्दिक पंड्या- ५ सामने, ७ विकेट्स
२. जसप्रीत बुमराह- ५ सामने, ६ विकेट्स
३. आशिष नेहरा- ४ सामने, ६ विकेट्स
४. आर अश्विन- ४ सामने, ४ विकेट्स
५. रविंद्र जडेजा- ४ सामने, ३ विकेट्स
५. भुवनेश्वर कुमार- १ सामना, २ विकेट्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर
महिला संघाच्या सुवर्णपदक सामन्यावेळी अशी होती ‘रोहित आणि कंपनी’ची अवस्था, फोटो होतोय व्हायरल
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ