भारतीय संघाने बुधवारी (31 ऑगस्ट) सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आशिया चषकातील सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात दिली होती आणि आता दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग संघाला देखील पराभवाची धूळ चारली. हाँगकाँगने या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रूमला भेट दिली. खेळाडूंचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतासाठी हाँगकाँग संघाला पराभूत करणे जास्त कठीण नव्हते, पण त्यांनी देखील शेवटपर्यंत खिंड लढवली. पराभव स्वीकारल्यानंतर हाँगकाँग संघ भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. याठिकाणी हाँगकाँगच्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या आवडत्या भारतीय खेळाडूंसोबत फोटो काढले. काहींना आवडत्या खेळाडूंकडून स्वाक्षरी देखील घेतली.
बीसीसीआयने हा सुंदर व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, राहुल द्रविड हे सर्व दिग्गज हाँगकाँगच्या खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहेत. हाँगकाँग संघात मुळचे भारत आणि पाकिस्तानचे असलेले खेळाडू मोठ्या संख्येत आहेत. अशात भारतीय खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जाणे हे त्यांच्यासाठी नक्कीच खास असेल. बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “लक्षात ठेवण्यासाठी चर्चा, जपण्यासाठी आठवणी आणि घेण्यासाठी धडे! भारतीय ड्रेसिंग रूममध्ये हाँगकाँग संघाची भेट.”
Conversations to remember, memories to cherish and lessons for the taking! 👍 👍
Wholesome scenes in the #TeamIndia dressing room when Team Hong Kong came visiting. 👏 👏#AsiaCup2022 | #INDvHK pic.twitter.com/GbwoLpvxlZ
— BCCI (@BCCI) September 1, 2022
दरम्यान, भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा सामना बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक गमावल्यानंतर हाँगकाँगने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 2 विकेट्सच्या नुकसानावर 192 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँग संघही सर्वच्या सर्व 20 षटके खेळला, पण त्यांना 193 धावांचे हे लक्ष्य मात्र गाठता आले नाही. त्यांनी 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावांपर्यंत मजल मारली. आशिया चषकात सलग दोन सामने जिंकल्यानंतर भारत आता या स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत दाखल झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कुमार आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा: पाच मानांकित खेळाडूंचा पराभव, अनुपमाचा संघर्षपूर्ण विजय
भारताच्या विजयानंतर हसीन जहॉंने पुन्हा साधला शमीवर निशाणा; केली वादग्रस्त पोस्ट
भारतावर प्रेम करणारा वॉर्नर नाही खेळणार भारताविरुद्ध! हे आहे कारण