बुधवारी (31 ऑगस्ट) भारताने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर हॉंगकॉंग संघाला ४० धावांनी पराभूत केले. आशिया चषक 2022 मधील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आणि संघ आता सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. सूर्यकुमार यादव या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला, त्याने हॉंगकॉंगच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि भारताला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर बोलताना त्याने स्वतःच्या वादळी खेळीविषयी महत्वाची माहिती दिली.
26 चेंडूत केली 68 धावांची वादळी खेळी –
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात मोठी खेळी करू शकला. त्याने एकूण 26 चेंडू खेळले आणि 68 धावा केल्या. या धावा त्याने 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने केल्या. सामन्यात मारलेल्या 6 षटकारांपैकी 4 षटकात त्याने डावातील शेवटच्या षटकात मारले. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने मर्यादित 20 षटकांमध्ये 2 विकेट्सच्या नुकसानावर 192 धावा केल्या. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्या साथीने 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी देखील पार पाडली. सूर्यकुमारने या खेळीदरम्यान एकापेक्षा एक शॉट्स मारले, ज्यासाठी त्याचे कौतुक होत आहे. सामना संपल्यानंतर तो या शॉट्सविषयी बोलला.
विजयानंतर ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी –
तुफानी खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर निवडले गेले. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला प्रश्न विचारला गेला की, तो मैदानात एवढे वेगवेगळे शॉट्स कसे खेळतो? हे शॉट्स आधीच ठरवून येतो की, मैदानातील परिस्थितीत पाहून शॉट्स खेळण्याचा निर्णय घेतो? या प्रश्नावर सूर्यकुमारने उत्तर दिले की, “माझे काही शॉट्स आधीच ठरलेले असतात कारण हा फॉरमॅट असा आहे, जिथे तुम्हाला फलंदाजीसाठी तयारी करावी लागते. पण जेव्हा मैदानात जातो, तेव्हा वास्तविक परिस्थितीचे भान असणे देखील महत्वाचे असते.”
संथ गतीच्या खेळपट्टीविषयीही बोलला सूर्यकुमार यादव –
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळल्या गेलेल्या हॉंगकॉंगविरुद्धच्या या सामन्यात खेळपट्टी संथ असल्याचे सांगितले गेले. याविषयी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “खेळपट्टी थोडी संथ गतीची आगे. पण माझी रणनिती स्पष्ट होती की, मैदानात जाऊन मोठे शॉट्स खेळायचे आहेत. संघात वेळोवेळी तुम्हाला अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतील. तुम्हाला तसे बनावे लागेल, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी फलंदाजी करू शकाल. मी आधीही अनेकदा असे केले आहे. मला असे करायला आवडते आणि मजा देखील येते.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारच्या ‘360 डिग्री’ फलंदाजीच्या प्रेमात पडला कोहली, स्टेडियममध्ये खाली झुकून केला मुजरा
माईलस्टोन! जड्डू बनला आशिया कपमध्ये एक नंबर! दिग्गज भारतीयालाच सोडले मागे
भारताच्या विजयानंतर आमिरवर भडकले पाकिस्तानी फॅन्स; म्हणाले, “तू फिक्सर होतास आणि राहशील”