जेव्हा-जेव्हा भारताचा सामना मैदानावर पाकिस्तानशी होतो. तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले. ओमानची राजधानी मस्कत येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत ज्युनियर एशिया कप 2024चे विजेतेपद पटकावले. भारताने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर आशिया कप जिंकण्यात यश मिळविले आहे. याआधी भारतीय ज्युनियर हॉकी संघाने 2015 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
ज्युनियर आशिया चषक 2024 मस्कत येथे 26 नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. ज्यामध्ये 10 संघांनी भाग घेतला. भारताने ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर पाकिस्तानने ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवून अंतिम-4 मध्ये प्रवेश केला होता. यानंतर पाकिस्तानने जपानला 4-2 असे पराभूत करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. तर भारताने मलेशियाचा 3-1 असा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. पण अखेरीस भारतीय संघाला 5-3 असे विजेतेपद पटकावण्यात यश आले.
ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 20 वर्षीय अरायजित सिंग हुंदलने भारतासाठी 4 गोल केले तर एक गोल दिलराजने केला. पाकिस्तानकडून सुफयान खानने 2 आणि हनान शाहिदने 1 गोल केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे. तर भारताविरुद्धचा हा सलग तिसरा पराभव आहे. 2012 पासून पाकिस्तान संघ फायनलमध्ये पराभूत होत आहे.
“Congratulations to India, Pakistan, and Japan for winning the Gold, Silver, and Bronze medals, respectively, of the Men’s Junior Asia Cup 2024! A fantastic event with the rising stars of our sport played in a magnificent venue and with a superb organisation from Oman!” – Tayyab… pic.twitter.com/78ZjbGIjXQ
— International Hockey Federation (@FIH_Hockey) December 4, 2024
खंडीय स्पर्धेतील भारताचे हे पाचवे विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने 2004, 2008, 2015 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. 2021 मध्ये कोविड-19 महामारीमुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. हुंदलने चौथ्या, 18व्या आणि 54व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोल मध्ये केले. त्यानंतर 47व्या मिनिटाला मैदानी गोल केला. भारतासाठी दुसरा गोल दिलराज सिंगने (19व्या मिनिटाला) केला. पाकिस्तानकडून सुफियान खानने (30व्या आणि 39व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरित केले तर हन्नान शाहिदने तिसऱ्या मिनिटाला मैदानी गोल केला.
हेही वाचा-
“कसोटी क्रिकेटमध्ये रिषभ पंतने विलक्षण…” माजी दिग्गजाने केले पंतचे कौतुक!
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टँडला ‘या’ खेळाडूंची नावे असणार! केएल राहुल म्हणाला, “एक दिवस माझेही…
“क्रिकेटला उच्च स्तरावर नेण्याची क्षमता जय शाह…” माजी आयसीसी अध्यक्ष्यांचे मोठे वक्तव्य