आशिया चषक शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात रविवारी (२८ ऑगस्ट) एकमेकांविरुद्ध करतील. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल याने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी राहुल विराट कोहली याच्या फॉर्मविषयी देखील बोलला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याचे हे प्रदर्शन भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत असल्याचे अनेकांना वाटते. परंतु, आशिया चषकात भारताच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) याला असे वाटत नाही. राहुलच्या मते विराट लवकरच फॉर्ममध्ये परतेल आणि संघासाठी ही जराही चिंतेची बाब नाहीये.
विराटच्या फॉर्मची कसलीच चिंता नाही
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी केएल राहुलने माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. विराटच्या फॉर्मविषयी बोलताना तो म्हणाला की, “आम्हा सर्वांना वाटते की, विराट कोहलीने फॉर्म पुन्हा मिळवावा, पण आम्हाला त्याविषयी कसलीही चिंता नाहीये. भारताला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याची मानसिकता नेहमीच एकसारखी असते. तो अनेक वर्षांपासून असे करत आला आहे.”
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी नेहमीच तयार असतो भारतीय संघ
“आम्ही नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तयार असतो. आम्ही एकमेकांविरुद्ध दुसरीकडे कुठेच खेळत नाही, फक्त या मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळते. हा नेहमीच एक रोमांचक वेळ असतो आणि आम्हा सर्वांसाठी पाकिस्तान सारख्या संघाचा सामना करणे एक मोठे आव्हान आहे,” असेही राहुल पुढे बोलताना म्हणाला.
'As players and as a team we always look forward to an India vs Pakistan clash,' says #TeamIndia vice-captain @klrahul ahead of #INDvPAK on Sunday.#AsiaCup2022 pic.twitter.com/7mRf1zxjaS
— BCCI (@BCCI) August 26, 2022
दरम्यान, मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा विश्वचषकात पाकिस्तानने भारताला धूल चारली होती. आता या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ असेल.
आशिया चषकासाठी निवडलेले दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर.
पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद, उस्मान कादिर, फखर जमान, हारिस रऊफ, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहनवाज दहानी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चिराग-सात्विक यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या दुहेरीत कांस्य जिंकणारी ठरली पहिली पुरूष जोडी
भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट
जिंकलस! ‘लोखंडी भिंत’ही नाही रोखू शकली रोहितचं चाहत्यांवरील प्रेम, पाकिस्तानी फॅनला मारली मिठी