आशिया चषक शनिवारी (27 ऑगस्ट) सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफिगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. भारताला त्यांचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन विरोधी राष्ट्रांमधील लढत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. उभय संघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया या मैदानातील खेळपट्टीविषयी.
भारतीय संघाला अलिकडच्या काही वर्षांमध्ये यूएई मध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आला आहे. मागच्या वर्षीचा टी-20 विश्वचषक याच ठिकाणी खेळला गेला होता. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी एक संपूर्ण आणि एक अर्धा आयपीएल हंगामही खेळवला गेला होता. यादरम्यानच्या काळात भारतीय खेळाडूंची याठिकाणच्या खेळपट्टीशी काही प्रमाणात का होईन ओळख झाली आगे. असे असले तरी, भारतीय संघासाठी ही खेळपट्टी अनुकून असेलच असे नाही.
भारतीय संघाला संथ गतीच्या खेळपट्टीवर शक्यतो अपेक्षित कामगिरी करता येत नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तसेच 140 किमी ताशीपेक्षा अधिक गतीने जे गोलंदाज चेंडू टाकू शकतात त्यांच्यासाठीही ही खेळपट्टी अनुकूल आहे. अलिकडच्या काळात फिरकी गोलंदाजांसाबोतच अशा वेगवान गोलंदाजांनी देखील याठिकाणी चांगले प्रदर्शन केल्याचे दिसले आहे. खेळपट्टीतील ही विविधतेमुळे गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
तत्पूर्वी भारतीय संघाने दुबईमध्ये टी-20 विश्वचषकादरम्यान एकूण 4 सामने खेळले होते. यापैकी दोन सामन्यात त्यांना विजय, तर दोन सामन्यात पराभव मिळाला. स्कॉटलंड आणि नामिबिया अशा दुबळ्या संघांविरुद्ध भारताने विजय मिळवला होता, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या प्रमुख संघांकडून मात्र पराभव स्वीकारण्याची वेळ संघावर आली होती. भारताने या दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावली होती आणि ही बाब आशिया चषकात देखील महत्वाची ठरणार, यात शंका नाही. दुसरीकडे पाकिस्तान संघासाठी यूएईतील मैदाने ही त्यांच्या होम ग्राउंड प्रमाणे आहेत. त्यांनी याठिकाणी आजवर अनेक सामने खेळले आहेत. अशात रोहित शर्मा आणि त्याच्या संघासाठी ही एक धोक्याची घंटा मानली जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक जिंकल्यावर रोहित होणार ‘शर्टलेस’, पाहा चाहत्याला काय दिलंय वचन
‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला
‘ज्याने अफवा पसरवली तो इथेच आहे’, चहल-धनश्रीच्या नात्याविषयी रोहितने केला खुलासा