भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाहीये. मात्र, आगामी आशिया चषकासाठी निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात निवडले आहे. आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्ट पासून होईल. तत्पूर्वी राहुलच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
केएल राहुल (KL Rahul) आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. त्याने कर्णधारपदासोबतच फलंदाजाच्या रूपात स्वतःची जाबाबदारी चोख पार पाडली. त्याच्या नेतृत्वातील लखनऊ संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला, पण अंतिम सामन्यातपर्यंत पोहोचू शकला नाही. राहुलने या हंगामात ६१६ धावांचे योगदान दिले. असे असले तरी, आयपीएल संपल्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाहीये.
आयपीएल संपल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला अचानक या मालिकेतून माघार घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी त्याने विदेशात जाऊन शस्त्रक्रिया देखील केली होती. उपचारानंतर राहुल वेस्ट इंडीज दौऱ्यातून संघात पुनरागमन करणार होता, पण ऐनवेळी त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली. आता आगामी आशिया चषकासाठी राहुलच्या नावाची निवड केली गेली आहे, पण तत्पूर्वी त्याला स्वतःची फिटनेस सिद्ध करावी लागेल.
माध्यमांतील वृत्तानुसार राहुलला आशिया चषकासाठी निवडले गेले असले, तरी त्याला फिटनेस चाचणी द्यावे लागेल. सूत्राच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, “राहुल पूर्णपणे फिट आहे. याच कारणास्तव त्याला संघात निवडले गेले आहे. पण नियमांप्रमाणे त्याला बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी द्यावी लागेल. पुढच्या आठवड्यात त्याची फिटनेस चाचणी होऊ शकते. जर तो ही चाचणी पार करू शकला नाही, तर राखीव खेळाडूच्या रूपात निवडला गेलेला श्रेयस अय्यर यूएईला जाईल.”
दरम्यान, आशिया चषकातील पहिला सामना भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळले. आशिया चषकात एकूण ६ संघ सहभागी होणार असून तीन-तीन संघाचे दोन ग्रुप बनवले गेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर जिंकणारा एक संघ असे एकून तीन संघ एका ग्रुपमध्ये आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधील पहिले दोन संघ उपांत्य सामन्यात खेळतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रेणुका सिंगच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग, कॉमनवेल्थमधील प्रदर्शनाचा मोठा फायदा
लईच वाईट! ‘या’ अंपायरचा झालाय रुडी कर्स्टनपेक्षाही दुर्देवी अंत, चक्क बॉम्बस्फोटात गमावला होता जीव