आशिया चषक 2022 मध्ये शुक्रवारी (2 सप्टेंबर) रोजी पाकिस्तान आणि हाँगकाँग संघ आमने सामने येणार आहेत. पाकिस्तान संघाला सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. हाँगकाँगचे आव्हान पाकिस्तानसाठी तसे पाहले तर सोपेच आहे, परंतु बुधवारी (31 ऑगस्ट) भारताविरुद्ध हाँगकाँग संघ ज्या पद्धतीने खेळला, ते पाहता पाकिस्तानला देखील सावधगिरी बाळगावी लागेल. असे असले तरी, पाकिस्तान संघ मात्र गाफील राहिल्याचे दिसते. कारण त्यांनी या सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्र रद्द केले.
आशिया चषकातील ‘ग्रुप ए’ मधील तिसरा सामना शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाईल. पाकिस्तानचा हा आशिया चषकातील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून त्यांना ५ विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे हाँगकाँग देखील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 40 धावांच्या अंतराने पराभूत केला. भारताप्रमाणेच पाकिस्तान संघही हाँगकाँगला मात देईल अशी पूर्ण शक्यता आहे, पण तरीदेखील पाकिस्तानला गाफील राहून चारणार नाहीये.
हाँगकाँगशी भिडण्यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे सराव सत्र ठरलेले होते. परंतु ऐन वेळी त्यांना हे सराव सत्र रद्द केले. पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनलने याविषयी माहिती दिली. माहितीनुसार संघ सराव सत्र रद्द करून हॉटेमध्ये आराम करत आहे. संघाने घेतेलेल्या या निर्णयाचे ठोस कारण अध्याप समजू शकले नाहीये. परंतु वृत्तांनुसार भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या काही खेलाडूंना सराव सत्रात काही दुखापती आणि थकवा आला आहे. असेही सांगितले जात आहे की, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांना या अडचणी आल्या आहेत.
असेही मानले जात आहे की, दुबईतील उष्णता हे देखील सराव सत्र रद्द करण्याचे एक कारण असू शकते. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू ताजेतवाने राहण्यासाठी संघ व्यवस्तापनाने हा निर्णय घेतला असू शकतो. असे असले तरी, पाकिस्तानाच कर्णधार बाबर आणज आणि हसन अली यांच्यासह काही इतर खेळाडू मात्र मैदानात सराव करताना दिसले. अशात वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड नक्कीच फुटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोके ना रुके नैना…! बांगलादेशचा पराभव चिमुकल्याच्या जिव्हारी, स्टेडियममध्येच ढसाढला रडला
चोरीचा मामला.. बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची चिटिंग? ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आले सिक्रेट कोड
‘आम्हालाही काही सल्ले द्या’, करा वा मरा लढतीपूर्वी हाँगकाँगच्या कर्णधाराची आझमकडे मदतीसाठी धाव