आशिया चषक (Asia Cup) 2022चा चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग (INDvsHK) यांच्यात झाला. हा सामना बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई येथे खेळला गेला. भारताने हा सामना 40 धावांनी जिंकत सुपर फोरममध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताच्या विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हाँगकाँगचा बाबर हयात यांनी विशेष खेळी केली. यावरूनच पाकिस्तानच्या एका पत्रकाराने ट्वीट केले आहे. त्याने त्या ट्वीटमध्ये जे लिहिले त्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
पाकिस्तानचा पत्रकार अर्फा फिरोज जेक याने भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले, ‘बाबर हयात याने केलेली 41 धावांची खेळी विराट कोहलीच्या नाबाद 59 आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद 68 धावांपेक्षा अधिक उत्तम आहे. प्रत्येक वेळी विराटचे कौतुक करणे योग्य नाही, जेव्हा सर्वाधिक संधी न मिळालेला प्रतिस्पर्धी संघ तुमच्यापेक्षा चांगले खेळत आहे.’
जेकने ट्वीट करताच भारतीय चाहत्यांनी त्याला चागंलीच खरीखोटी सुनावली आहे. ऐवढेच नाही तर पाकिस्तानच्या काही चाहत्यांनीही त्यामध्ये सहभाग घेतला आहे. काही चाहत्यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि बाबर हयात यांची तुलनादेखील केली आहे.
Babar Hayat scored 41 against the same attack where as Babar Azam just managed 10 runs.
Hence Babar Hayat >>> Babar Azam
— Indian 🇮🇳 (@ShivamOswal) August 31, 2022
https://twitter.com/durgeshp1327/status/1565022172439011336?s=20&t=Q4p4EDte_ISreTokGYTX0w
जेव्हा चर्चा पाकिस्तान किंवा भारतीय खेळाडूंची होते तेव्हा सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापलेले असते. त्यातच विराट कोहली (Virat Kohli) याने लयीत येत मागील दोन्ही सामन्यांत चांगल्या धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही हाँगकाँगच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली.
विराट-सूर्यकुमार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली. यामुळे भारताने 20 षटकात 2 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. यावेळी विराटने गोलंदाजीही केली आहे. त्याने एक षटक टाकताना 6 धावा दिल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 152 धावा केल्या. यावेळी बाबर हयात याने 35 चेंडूत 41 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! हॉंगकॉंगच्या संघाला केले ड्रेसिंग रूममध्ये आमंत्रित; पाहा खास छायाचित्रे
बहुप्रतिक्षित अर्धशतकासह विराटने मागे टाकला ‘गुरू’ द्रविड! सचिनपर्यंत पोहोचण्यासाठी करणार प्रयत्नांची शर्थ
जेम्स अँडरसनने ट्विटरवर म्यूट केलेल्या शब्दांचा केला खुलासा, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचाही समावेश