भारतीय संघ त्यांचा आशिया चषक (Asia Cup) 2022 स्पर्धेच्या हंगामातील शेवटचा सामना गुरूवारी (8 सप्टेंबर) अफगाणिस्तान विरुद्ध खेळत आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघाच्या अंतिम फेरीच्या आशा केव्हाच संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे हा सामना औपचारिकच आहे. त्यातच या सामन्यात भारताचे नेतृत्व नियमित कर्णधार रोहित शर्मा हा नाही तर केएल राहुल करत आहे. यामुळे चाहते चांगलेच चिडले असून त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
या सामन्यात नाणेफेकीसाठी केएल राहुल (KL Rahul) आला असता चाहते चकीत झाले. तर राहुलने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, रोहित सतत सामने खेळत असल्याने त्याला आरामाची आवश्यकता आहे. रोहित नसल्याने विराट कोहली (Virat Kohli) राहुलसोबत सलामीला आला. तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि युझवेंद्र चहल यांनाही आराम दिला गेला आहे. हार्दिक हाँगकाँग विरुद्धही खेळला नव्हता.
रोहितच्या आरामाबाबत एका नेटकऱ्याने लिहिले, ‘भारताच्या कोणत्याही कर्णधाराने त्याच्या कार्यकाळात एवढा ब्रेक घेतला नाही, जेवढा रोहित शर्माने घेतला आहे. तुम्ही आयपीएलमध्ये सतत खेळता आणि जेव्हा देशासाठी नाही खेळत अशाने विश्वचषक विसरा.’
I don't understand indian team we hardly see any other captain take break in the big tournaments but our captains and players has made this a joke if they can play 14 regular matches in ipl then why can't they play for country 🤔 that's sure this way forget the world Cup
— Gavy Avast (@Avastga) September 8, 2022
आणखी एका नेटकऱ्याने रोहितच्या अनुपस्थितीबाबत लिहिले, ‘फजलहक फारुखीच्या गोलंदाजीला रोहित घाबरला. मोहम्मद हमजा नावाच्या व्यक्तिने लिहिले, बाकी कर्णधारांची तुलना केली असता रोहितने मागील वर्षात अधिक आराम केला आहे.’ तर एकाने म्हटले, ‘रोहितने मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जाता येऊ नये म्हणून ब्रेक घेतला आहे, कारण तो आताच संघात परतला होता.’
या स्पर्धेनंतर भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. तर ही मालिका 12 दिवसांनतर सुरू होणार आहेत. त्यामुळे एका खेळाडूसाठी इतक्या दिवसांचा आराम योग्य आहे. मात्र रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध न खेळल्याने चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC Team Ranking | ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पराभव न्यूझीलंडाला चांगलेच पडले महागात, ‘हा’ संघ बनला नंबर वन
अरे हे गल्ली क्रिकेट आहे का? ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केली हास्यास्पद चूक; पाहा व्हिडिओ
टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला खेळणार भारतीय संघ