दुबईच्या मैदानावर रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा आमना सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावांवरच गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांच्या खेळींच्या जोरावर 19.4 षटकातच 5 विकेट्स राखून सामना जिंकला. पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्यावर राग व्यक्त केला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अख्तरने (Shoaib Akhtar) आझमवर निशाणा (Shoaib Akhtar Expresses Anger) साधला आहे. अख्तर म्हणाला की, “आझमला मी कितीवेळा सांगितले आहे की, त्याने सलामीला नव्हे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. जेणेकरून तो डावाअंती फलंदाजी करू शकेल. तर फखर जमान आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची सुरुवात करायला पाहिजे. परंतु आझमने भारताविरुद्धच्या सामन्यात फार वेगळे निर्णय घेतले. त्याने शादाब खानलाही वरती फलंदाजीला पाठवले आणि आसिफ अलीला खाली पाठवले. मला तर कळतच नाहीये, आझम कशासाठी पाकिस्तानचे नेतृत्त्व करत आहेत.”
याखेरीज अख्तरने यष्टीरक्षक फलंदाज आणि सलामीवीर रिझवानचेही कान टोचले आहेत. रिझवानने पाकिस्तानकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. परंतु या धावा त्याने अतिशय संथ गतीने केल्या. 42 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार 4 चौकार मारत त्याने या धावा केल्या. याच हळूवार खेळीवरून अख्तर रिझवानवर भडकला आहे.
अख्तर म्हणाला की, “जर रिझवान (Mohammad Rizwan) 45 चेंडूत 45 धावा करेल तर कसे चालेल. त्याने पहिल्या 6 षटकांमध्ये 19 डॉट बॉल खेळले. पावरप्लेमध्ये इतके डॉट खेळल्यास कोणताही संघ अडचणीत सापडेल.”
याखेरीज अख्तरने भारताच्या मॅच विनर हार्दिक पंड्या याचेही कौतुक केले आहे. अख्तर म्हणाला की, “मी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ इच्छितो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु भारतीय संघाचे प्रयत्न शेवटी यशस्वी ठरले. शेवटी हार्दिक पंड्याने संघाची नाव किनाऱ्यावर लावली.”
VIDEO: हार्दिकने पाकिस्तानी संघाची केली टाय-टाय फिस; अफगाणिस्तानी चाहत्याने पंड्याला केलं किस
हार्दिकच्या हृद्यात आहे माही! विजयानंतर धोनीला दिले आपल्या स्फोटक खेळीचे क्रेडिट
‘जर 10 फिल्डरही बाउंड्रीवर असते, तरीही मी…’, हार्दिकने असा केलाय पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’