संयुक्त अरब अमिरातीत (युएई) सुरू असलेली आशिया चषक 2022 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी सामने पार पडले असून आता सुपर-4 फेरीला सुरुवात होणार आहे. अ गटातून भारत आणि पाकिस्तान तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंका (AFGvsSL) संघांनी सुपर-4 साठी (Super-4) पात्रता मिळवली आहे. आता शनिवारी (02 सप्टेंबर) सुपर-4 मधील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात रंगणार आहे. हा सामना जिंकत उभय संघ अंतिम सामन्यासाठी आपला दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
यापूर्वीही श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आले होते. आशिया चषक 2022 मधील (Asia Cup 2022) पहिलाच सामना या संघांमध्ये झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला 8 विकेट्सने पराभूत केले होते. अशात आता सुपर-4 मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या सुपर-4 सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
तारीख आणि वेळ: शनिवार 03 सप्टेंबर, ७.३० वाजता
स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संपूर्ण संघ-
श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा, महीष तीक्षणा, जैफ्री वांडेरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, मतीशा पथिराना, नुवानिदु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल
अफगानिस्तान संघ: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, अफसर ज़ज़ई, अज़मतुल्लाह ओमरज़ई, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हज़रतुल्लाह जजई, इब्राहिम ज़दरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह ज़दरान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी
स्टँडबाय: निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ
श्रीलंका आणि अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
श्रीलंकेचा संघ: दनुष्का गुणाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, दसुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
अफगाणिस्तान संघ : हजरतुल्लाह जजई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जदरान, नजीबुल्लाह जदरान, करीम जनत, मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, अजमतुल्लाह ओमरजई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूंमध्ये माणुसकी नाहीच! 78 वर्षीय माणसाला मदत करण्यास कोणीही आले नाही समोर
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार
PAKvsHK | 8 2 0 6 1 4 3 3 0 1 0.. हा कोणाचा मोबाईल नंबर नसून आहे हाँगकाँगची धावसंख्या