आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा दिग्गज फलंदाज केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाला. तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. अशात भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कैफ म्हणाला आहे, की केएल राहुल याचे आशिया चषकापूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होणे, ही भारतीय संघासाठी चांगली बातमी नाहीये.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेची सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्याने म्हटले की, केएल राहुल (KL Rahul) पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. अलीकडेच, ज्यावेळी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली होती, तेव्हा मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी राहुल आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची भारतीय संघात निवड केली होती. मात्र, आता अशा बातम्या समोर येत आहेत की, राहुल पूर्णपणे फिट नाहीये.
‘केएल राहुलचे अनफिट असणे संघासाठी वाईट बातमी’
मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याच्यानुसार, केएल राहुल याचे पुन्हा एकदा अनफिट होणे भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, “याचा अर्थ असा आहे, केएल राहुलची दुखापत आणखी गंभीर असू शकते. जर तो आताही अनफिट आहे, तर तो दोन सामन्यांनंतर फिट होईल याची खात्री नाही. भारतीय चाहत्यांसाठी ही चांगली बातमी नाहीये. कारण, राहुल वनडे सामन्यात पाचव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. त्याची आकडेवारीही चांगली आहे. राहुलला माहिती आहे की, कशाप्रकारे गतीने धावा करायच्या आहेत. जर तुम्ही ईशान किशनलाही तिथे खेळवले, तरीही तुम्हाला केएल राहुलचा बदली खेळाडू मिळणार नाही.”
खरं तर, केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. तो भारतासाठी वरच्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो. भारतीय संघ आशिया चषकातील अभियान 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. (asia cup 2023 former cricketer mohammad kaif reacts on kl rahul injury status)
हेही वाचाच-
‘शाहीन आफ्रिदीने विराटला…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी स्पष्टच बोलला दिग्गज; लगेच वाचा
‘हो’ म्हणली रे! मिलरने किस करत गर्लफ्रेंडला केले Propose, शुबमन-हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष