पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात शनिवारी (2 सप्टेंबर) भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावताना दिसले. श्रेयस अय्यर याच्या रुपात भारतीय संघाने आपली तिसरीव विकेट गमावली. अय्यर खेळपट्टीवर आल्यानंतर आत्मविश्वासने खेळताना दिसला. पण 9 चेंडूत 14 धावा करून हॅरिस रौफ याची शिकार देखील बनला. भारताच्या डावातील 10व्या षटकात त्याने विकेट गमावली.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी रोहित शर्मा याच्या रुपात पहिली विकेट मिळाली. रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली याच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला. विराटने 7 चेंडूत 4 धावा करून विकेट गमावली. या दोघांनाही वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने बाद केले. त्यानंतर तिसरी विकेट मात्र हॅरिस रौफ (Harris Rauf) याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या रुपात घेतली. अय्यरची विकेट गेली तेव्हा भारताची धावसंख्या 9.5 षटकात 3 बाद 48 धावा होती. (India lost their 3rd Wicket as Shreyas Iyer is dismissed)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी गोलंदाज फॉर्मात! घातक चेंडुमुळे मोडली श्रेयस अय्यरची बॅट, एकदा पाहाच
शाहिन आफ्रिदीने केला 140 कोटी भारतीयांचा हिरमोड, रोहितनंतर विराटच्याही दांड्या गुल