पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शनिवारी (2 सप्टेंबर) कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. शाहीन आफ्रिदी याच्या स्विंग चेंडूवर दोघांनी विकेट गमावली. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर लयीत दिसत होता. पण डावातील आढव्या षटकात हॅरिस रौफ याने टाकेलल्या घातक चेंडूमुळे अय्यरला नवी बॅट मागवून घ्यावी लागली.
श्रेयस अय्यर () याला यावर्षी मार्च महिनतील पहिल्या आठवड्यात दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर असताना उभय संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला मालिका अर्ध्यात सोडावी लागली होती. यानंतर अय्यरला थेट आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली आहे. दरम्यानच्या काळात त्याने जास्त क्रिकेट खेळले नसले, तरी फिटनेवर चांगले काम आणि नेट्समध्ये सराव केला आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1697924431501545637?s=20
बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस मिळवल्यानंतर शनिवारी अय्यर चांगल्या लयीत दिसत होता. भारताच्या डावातील आठव्या षटाकत अय्यरची बॅट तुटली. हॅरिस रौफ याच्या वेगवान चेंडूमुळे बॅट तुटल्यानंतर अय्यरला नवी बॅट मागवावी लागली, पण मध्यक्रमातील फलंदाज आपली खेळी मोठी करू शकला नाही. 9 चेंडूत 14 धावा करून त्याने विकेट गमावली. डावातील दहाव्या षटकात हॅरिस रौफ याने फखर जमानच्या हातात अय्यरला झेलबाद केले. (Asia Cup 2023, IND vs PAK, Shreyas Iyer’s bat broken on Haris Rauf’s delivery.)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर गंभीर नाराज! म्हणाला, “त्याला का बसवले?”
पाकिस्तानची सुंदरी आहे विराटची डाय हार्ट फॅन, पोहोचली श्रीलंकेला, कोणाच्या विजयासाठी प्रार्थना?