भारतीय संघ आशिया चषक 2023चा दुसरा सामना नेपाळ संघाविरुद्ध खेळत आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) हा सामना श्रीलंकेतील कँडी शहरात आयोजित केला गेला. भारताने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, सुरुवातीच्या पाच षटकात भारतीय खेळाडूंकडून तीन झेल सुटले, जे संघासाठी अतिशय महत्वाचे ठरू शकत होते.
भारतीय संघ गोलंदाजीला आल्यानंतर पहिले षटका टाकण्यासाठी मोहम्मद शमी (Mohammad Shami) आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुशल भुर्टेल (Kushal Bhurtel) स्ट्राईकवर होता. या चेंडू कुशलच्या बॅटला लागून स्लिप्समध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे गेला. मात्र, अय्यरला चेंडूचा अंदाजा न आल्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळाले. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा स्लिप्समध्ये फलंदाजाल जीनवदार मिळाले. मात्र, यावेळी झेल विराट कोहली (Virat Kohli) याच्या हातून सुटल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहम्मद सिराज गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर असिफ शेख (Asif Sheikh) होता. यावेळी नशीब असिफसोबत होते, असे म्हणता येऊ शकते. कारण विराटच्या हातून झेल सुटणे, ही गोष्ट दुर्मिळच आहे.
People question fitness of Rohit Sharma but i see Virat Kohli dropping easy catches more often than not 😭😭 pic.twitter.com/7xr5TDItmI
— ANSHUMAN🚩 (@AvengerReturns) September 4, 2023
https://twitter.com/pullshotx45/status/1698635084830761471?s=20
https://twitter.com/12th_khiladi/status/1698634835806548353?s=20
नेपाळच्या डावातील पावच्या षटकात देखील भारतीय संघाचे श्रेत्ररक्षण ढिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. युवा यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) याने कुशल बुर्टेल याला पुन्हा एक संधी दिली. यावेळीही गोलंदाज मोहम्मद शमी होता आणि पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षकाकडून झेल सुटला. पाचव्या षटकाखेर नेपाळची धावसंख्या एकही विकेट न गमावता 23 पर्यंत पोहोचली. (Asia Cup 2023, INDvsNEP । 3 regulation catches dropped by India within first 5 overs)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
नेपाळ प्लेईंग इलेव्हन- असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी
महत्वाच्या बातम्या –
शेवटी मान्य केलेच! शाहीन आफ्रिदीचे मोठे वक्तव्य, म्हणाला, ‘विराट दिग्गज…’
जायंट कॉर्नवॉलचे CPL मध्ये वादळ! ऐतिहासिक शतक ठोकत मुलाला दिले ‘बर्थ डे’ गिफ्ट