आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात शनिवारी (दि. 09 सप्टेंबर) रोजी खेळला गेला. या सामन्यात श्रीलंका संघाने बांगलादेशला 21 धावांनी पराभूत करत फक्त विजयच मिळवला नाही, तर त्यांना जवळपास अंतिम सामन्याच्या शर्यतीतूनही बाहेर केले. बांगलादेश संघाचा हा सुपर- 4 फेरीतील सलग दुसरा पराभव आहे.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या नेतृत्वातील बांगलादेश संघ पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत झाला होता. त्यामुळे त्यांना आतापर्यंत पॉइंट्स टेबलमध्ये खातेही उघडता आले नाहीये. बांगलादेशचा पुढील सामना 15 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध आहे. हा सामना त्यांनी जिंकला, तर त्यांना जास्तीत जास्त 2 गुण मिळतील. तसेच, एवढ्या गुणांसह अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय करणे जरा कठीण आहे.
Sri Lanka emerges victorious, wrap it up by 21 runs! Takes two points.✌️#AsiaCup2023 #SLvBAN #LankanLions pic.twitter.com/oyMLPRvCiX
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2023
आशिया चषक 2023ची ताजी गुणतालिका
श्रीलंका संघाने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्यांचे पाकिस्तानइतके म्हणजेच 2 गुण झाले आहेत. मात्र, कमी नेट रनरेटमुळे कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याचा संघ ताज्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. सुपर- 4 फेरीत श्रीलंका संघाचा गुणतालिकेतील नेट रनरेट +0.420 इतका आहे. तसेच, बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाचा नेट रनरेट +1.051 इतका आहे.
Points table on 10 September 2023 before the monster rivalry of #INDvsPAK #PakvsInd#AsiaCup2023 #AsiaCup pic.twitter.com/EVUWgTPNtN
— Leo 🎗️ (@larthbroke) September 10, 2023
दुसरीकडे, बांगलादेशविषयी बोलायचं झालं, तर सुपर- 4 फेरीतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यामुळे त्यांचा नेट रनरेट -0.749 इतका आहे. त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांना भारतीय संघाला फक्त पराभूत करायचे नाही, तर मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे.
श्रीलंका-बांगलादेश सामन्याचा आढावा
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या सुपर- 4 (Super- 4) फेरीतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) संघ आमने-सामने होता. या सामन्यात नाणेफेक गमावत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 257 धावा केल्या होत्या. यावेळी श्रीलंकेसाठी सदीरा समरविक्रमा याने सर्वाधिक 93 धावांची खेळी साकारली. श्रीलंकेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघ 48.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 236 धावाच करू शकला. बांगलादेशकडून तौहीद हृदोय याने सर्वाधिक 82 धावांची खेळी साकारली होती. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यावेळी श्रीलंकेकडून महीशा थीक्षणा, मथीशा पथिराना आणि कर्णधार दसून शनाका यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. (asia cup 2023 updated points table super 4 after sri lanka vs bangladesh match read here)
हेही वाचाच-
Asia Cup 2023: कोलंबोत पाकिस्तान भारताच्याही पुढे, असं आम्ही नाही, तर ‘ही’ आकडेवारी सांगतेय; पाहा
IND vs PAK: राखीव दिवशीही पाऊस पडला तर…? एका क्लिकवर मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर