---Advertisement---

आशिया कप 2025: भारत सुपर-4 मध्ये दाखल, दोन संघ बाहेर; बाकी संघांची स्थिती जाणून घ्या

On: मंगळवार, सप्टेंबर 16, 2025 6:26 AM
---Advertisement---

काल 15 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन सामन्यांनंतर दोन संघांवर स्पर्धेतून बाहेर होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यात भारताने सुपर-4 मध्ये आपली जागा निश्चित केली, तर ओमान आणि हॉन्गकॉंग चीन या दोन संघांचा प्रवास संपला.

ग्रुप ए मधील टीम इंडियाने सलग दोन विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे आणि सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे. पाकिस्तान आणि यूएई या संघांमध्ये अजूनही सुपर-4 साठीची लढत कायम आहे. ओमानच्या संघाला दोन पराभवांमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. भारताविरुद्धचा त्यांचा सामना फक्त औपचारिक ठरणार आहे.

ग्रुप ए पॉइंट्स टेबल :

भारत – 2 सामने, 2 विजय, 0 पराभव, 4 गुण, NRR +4.793
पाकिस्तान – 2 सामने, 1 विजय, 1 पराभव, 2 गुण, NRR +1.649
यूएई – 2 सामने, 1 विजय, 1 पराभव, 2 गुण, NRR -2.030
ओमान – 2 सामने, 0 विजय, 2 पराभव, 0 गुण, NRR -3.375

ग्रुप बी मध्ये श्रीलंका अव्वल स्थानावर असून अजूनही कोणत्याही संघाला अधिकृतरीत्या सुपर-4 चे तिकीट मिळालेले नाही. हॉन्गकॉंग चीनला मात्र सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आणि ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील आगामी सामने सुपर-4 मधील स्थिती ठरवतील.

ग्रुप बी पॉइंट्स टेबल :

श्रीलंका – 2 सामने, 2 विजय, 0 पराभव, 4 गुण, NRR +1.546
अफगाणिस्तान – 1 सामना, 1 विजय, 0 पराभव, 2 गुण, NRR +4.700
बांग्लादेश – 2 सामने, 1 विजय, 1 पराभव, 2 गुण, NRR -0.650
हॉन्गकॉंग चीन – 3 सामने, 0 विजय, 3 पराभव, 0 गुण, NRR -2.151

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---