सोमवारपासून (२३ मे) एशिया कप हॉकी २०२२ स्पर्धेला इंडोनेशियामध्ये सुरूवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये १-१ अशी बरोबरी झाली. भारताकडून कार्थी सेल्वमने एकमेव गोल नोंदवला. तसेच पाकिस्तानकडून अब्दुल राणाने गोल नोंदवला. विशेष म्हणजे चौथ्या क्वार्टरपर्यंत भारताकडे आघाडी होती, पण अखेरच्या क्षणी ही आघाडी गमावली.
गतविजेते म्हणून उतरलेल्या भारतीय संघाने (Team India) पहिल्याच क्वार्टरमध्ये गोल केला. भारताकडून कार्थी सेल्वमने (Karthi Selvam) नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून एक गोल केला. पाकिस्तानला देखील या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, पण ते गोल करू शकले नाहीत. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारत आपली आघाडी राखण्यात यशस्वी झाला. १६ व्या मिनिटाला पाकिस्तानला गोल करण्याची संधी होती, पण भारताचा गोलकीपर सुरज करकेरा याने चांगल्या प्रकारे तो गोल रोखला.
याच क्वार्टरमध्ये २१ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण, त्याचा फायदा उचलता आला नाही. तसेच २८ व्या मिनिटाला देखील सुरजने पाकिस्तानला गोल करण्यापासून रोखले. तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांचे खेळाडू गोल करू शकले नाहीत. या क्वार्टरमध्ये ३१ व्या मिनिटाला पाकिस्तानला आणि ३७ व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी होती. पण ही संधी दोन्ही संघांनी गमावली.
अखेरच्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण सुरजने ४६ व्या मिनिटाला अम्माद बटचा शॉटला रोखले. पण अखेरच्या क्षणी ५९ व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर अब्दुल राणाने ड्रॅग फ्लिकवर गोल केला. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली (India vs Pakistan).
Full-time! India made every effort in their first match against Pakistan, but they were tied at the end of Quarter 4. Looking forward to India's more energetic approach.
🇮🇳 1-1 🇵🇰#IndiakaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsPAK @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/1A2P3hfncB— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2022
या स्पर्धेसाठी (Asia Cup Hockey) भारताने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच संघाचे नेतृत्व बिरेंद्र लाकरा करत आहे. भारताने याआधी २०१७ साली मलेशियाला पराभूत करत तिसऱ्यांदा एशिया कप जिंकला होता. यावर्षी भारतीय संघाचा अ गटात समावेश असून या गटात जपान पाकिस्तान आणि इंडोनेशिया देखील आहेत. भारताचा पुढील सामना २४ मे रोजी जपानविरुद्ध होईल, तर २६ मे रोजी इंडोनेशियाविरुद्ध भारताला दोन हात करायचे आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ गोलंदाज म्हणतोय, ‘मी बॉलिंग करत असताना शेन वॉर्न मला आभाळातून बघत असतो’
भारतीय हाॅकी क्षेत्राचे मोठे नुकसान, ‘या’ माजी कर्णधाराचे निधन
व्ही.के.सोनावणे स्मृती चषक हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अकादमी संघाला विजेतेपद