एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामाला २७ ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे होणारी ही स्पर्धा आधीच भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यान चर्चेत आहे. त्यातच ही स्पर्धा क्रिकेट विश्वात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. या टी२० प्रकारच्या स्पर्धेचे प्रसारण संपूर्ण क्रिकेट विश्वात केले जाणार आहे. तर भारत-पाकिस्तान (INDvsPAK) सामन्यांचे थेट प्रक्षेपण तब्बल १३२ देशांमध्ये केले जाणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना क्रिकेटच्या आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधील सर्वाधिक थेट प्रक्षेपण होणारा सामना ठरणार आहे. भारतामध्ये या सामन्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स हे टीव्हीवर तर मोबाईलवर डिझ्नी-हॉटस्टारमार्फत थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हा एशिया कप स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणारा मास्टर अधिकार धारक आहे. त्यांनी जागतिक स्तरावर सर्वाधिक लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी असंख्य टिव्ही चॅनल्स आणि थेट प्रक्षेपण करणाऱ्या प्लॅटफॉर्मला परवाणा दिला आहे.
जागतिक स्तरावर एशिया कपचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या चॅनल्सची संपूर्ण यादी
भारत – स्टार स्पोर्ट्स, डिझ्नी हॉटस्टार, डीडी स्पोर्ट्स
पाकिस्तान- पीटीव्ही स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स, दराझ ऍण्ड टॅपमॅड
बांगलादेश- गाझी टीव्ही (जीटीव्ही)
ऑस्ट्रेलिया- फॉक्स स्पोर्ट्स
न्यूझीलंड- स्काय स्पोर्ट्स
दक्षिण आफ्रिका- सुपरस्पोर्ट्स नेटवर्क
अमेरिका, कॅनडा- विलो टीव्ही
इंग्लंड- स्काय स्पोर्ट्स नेटवर्क
अफगानिस्तान- एरियाना टीव्ही
कॅरेबियन- फ्लो टीव्ही
तसेच यप टीव्ही चॅनेलही एशिया कपचे थेट प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, मलेशिया, जपान, दक्षिण-पूर्व एशिया या देशांमध्ये दिसणार आहे.
एशिया कपमध्ये हिंदी भाषेचे समालोचन रवि शास्त्री, इरफान पठाण, संजय मांजरेकर, गौतम गंभीर, आकाश चोप्रा, जतिन सप्रू, संजय बांगर आणि दीप दासगुप्ता हे करणार आहेत. तसेच भारत या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
राखीव खेळाडू- दीपक चाहर, श्रेयस अय्यर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व
सात्विक-चिराग यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के
फक्त नावाने नव्हे, मनानेही ‘किंग’! लाहोरवरून भेटायला आलेल्या पाकिस्तानी चाहत्याची कोहलीने पूर्ण केली इच्छा