---Advertisement---

आशिया कप पुन्हा झाला स्थगित, आता ‘या’ साली होणार स्पर्धा

On: रविवार, मे 23, 2021 10:06 PM
---Advertisement---

आशिया कपच्या आयोजना मागील शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे नाहीत. सप्टेंबर २०२० मध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र कोरोना विषाणूचा फटका बसल्याने ही स्पर्धा दोनदा स्थगित करण्यात आली होती. आज आता आशिया क्रिकेट कौन्सिलने निर्णय जाहीर करत साल २०२३ पर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

व्यस्त वेळापत्रकामुळे घेतला निर्णय
आशिया क्रिकेट कौन्सिलने आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा यापूर्वीच दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. यावर्षाच्या अखेरीस तिचे आयोजन करण्याचा आशिया क्रिकेट कौन्सिलचा मानस होता. मात्र या वर्षाच्या शेवटी टी२० विश्वचषकाचे देखील आयोजन होणार आहे. त्यानंतर अ‍ॅशेस मालिका व इतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिका देखील खेळवण्याचे आयसीसीचे नियोजन आहे. त्यामुळेच २०२३ पर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आशिया क्रिकेट कौन्सिलने एक प्रेस रिलीज जारी करत याची माहिती दिली. यात म्हंटले आहे की, “आशिया क्रिकेट कौन्सिलच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डाने कोरोना विषाणूसंबधी लागू असलेले नियम आणि खबरदारी पाहून २०२० सालची ही स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलली होती. यावर्षी सगळ्या सहयोगी सदस्यांसह आयोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही चर्चा करत होतो. मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असल्याने या स्पर्धेच्या आयोजनासाठी वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे २०२३ पर्यंत आम्ही ही स्पर्धा स्थगित करत आहोत. आगामी काळात २०२३ सालच्या आशिया कपच्या तारखा जाहीर करण्यात येतील.”

दुसर्‍यांदा स्थगित झाली ही स्पर्धा
आशिया कप स्पर्धेला दुसर्‍यांदा स्थगिती देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा जून २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा २०२३ पर्यंत स्पर्धा पुढे ढकलल्या गेली आहे. या स्पर्धेचे आयोजन आधी पाकिस्तान मध्ये होणार होते. मात्र त्यानंतर श्रीलंकेकडे आयोजनाचे हक्क देण्यात आले होते. २०२३ साली आता श्रीलंकेतच या स्पर्धेचे आयोजन होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

या ५ भारतीय क्रिकेटपटूंनी केले आहे चित्रपटांमध्ये काम; एका विश्वचषकविजेत्या कर्णधाराचाही समावेश

टेस्ट चॅम्पियनशीप: भारताविरुद्ध खेळताना ‘या’ गोष्टीचा न्यूझीलंडला होणार सर्वाधिक फायदा, किवी फलंदाजाचा खुलासा

कोहलीची प्रशंसा करणार्‍या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---