इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारताला महिलांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. भारताचे हे या क्रिडा प्रकारातील पाचवे पदक आहे.
हिमा दास, पुवाम्मा राजू मछेंद्रा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा यांचा या भारतीय संघात समावेश होता. यांनी 3 मिनिटे 28.72 सेंकद वेळ नोदंवत सुवर्णमय कामगिरी केली. हिमा हि यावेळी पुढे होती.
तसेच बहरिनने रौप्य तर व्हिएतनामने कांस्यपदक पटकावले आहे.
GOLD by #TeamIndiaAthletics Women's 4x400m relay Team at #AsianGames2018 3:28.72 pic.twitter.com/KIuGyEEdA6
— Athletics Federation of India (@afiindia) August 30, 2018
तर भारतीय पुरूष संघाला या प्रकारात रौप्यपदक मिळाले आहे. कुन्हु पुथानपुरक्कल, धरूण अय्यास्वामी, मुहम्मद याहिया आणि अरोकिया राजीव यांचा या भारतीय संघात समावेश होता. त्यांनी 3 मिनिटे 1.85 सेंकद वेळ नोंदवली आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत या 18व्या एशियन गेम्समध्ये 13 सुवर्णपदके मिळवली असून यातील 7 सुवर्णपदके अॅथलेटिक्सनी पटकावली आहेत. यामुळे पदतालिकेत भारत 59 पदकांसह आठव्या स्थानावर आहे. यामध्ये 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विकेट, नो बाॅल आणि जसप्रीत बुमराह… हे त्रिकूट या सामन्यातही कायम
–एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात