जकार्तामध्ये सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सुधा सिंगने ३००० मीटरच्या स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुधाने ही शर्यत ९ मिनिटे ४०.०३ सेंकदात पूर्ण केली. तर तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ९ मिनिटे २६.५५ सेंकद आहे.
३२ वर्षीय, सुधाचे हे एशियन गेम्समधील दुसरे पदक असून याआधी तीने २०१०च्या गुआंगझोयूच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
Another Silver in Athletics for 🇮🇳#SudhaSingh keeps the tri colour flying high in Women's 3000 Steeple Chase! With an outstanding timing of 9:40.03 she clinched a 🥈. This is our 2nd consecutive Silver in Athletics today ✌🏻🎉 #KheloIndia #AsianGames2018 #IndiaAtAsianGames pic.twitter.com/KOqALcx058
— Col Rajyavardhan Rathore (Modi Ka Parivar) (@Ra_THORe) August 27, 2018
तसेच बहरिनच्या यावी विनफ्रेडने ९ मिनिटे ३६.५२ सेंकदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक तर व्हिएतनामच्या थाइ ओनह गुएनने ९ मिनिटे ४३.८३ सेंकदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले.
भारत या स्पर्धेत ४१ पदकांसह पदतालिकेत नवव्या स्थानावर आहे. यामध्ये ८ सुवर्णपदके, १३ रौप्यपदके आणि २० कांस्यपदकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक