इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला शनिवारी (25 आॅगस्ट) शॉटपुटमध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. हे सुवर्णपदक तेजिंद्रपाल सिंग तूरने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये मिळवून दिले आहे.
तेजिंद्रपालने पाचव्या प्रयत्नात 20.75 मीटर थ्रो करताना राष्ट्रीय विक्रम नोंदवत हे सुवर्णपदक जिंकले.
तसेच या स्पर्धेत चीनच्या यांग लीउने तिसऱ्या प्रयत्नात 19.52 मीटर थ्रो करत रौप्यपदक तर कझाकस्तानच्या इवान इवानोकने दुसऱ्या प्रयत्नात 19.40 मीटर थ्रो करुन कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
तेजिंद्रपालने या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात 19.96 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 19.15 मीटर थ्रो केला होता. तर तिसरा थ्रोमध्ये तो अपयशी ठरला. मात्र त्यानंतर त्याने 19.96 मीटरचा चौथा थ्रो केला आणि पाचव्या थ्रोला 20. 75 मीटर थ्रो करत एशियन गेम्सचा विक्रमही नोंदवला. तसेच सहाव्या प्रयत्नतही त्याने 20 मीटर थ्रो केला होता.
त्याने 2017ला भुवनेश्वर येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळाले होते. तसेच गोल्ड कोस्ट येथे यावर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
भारताला एशियन गेम्स 2018 मध्ये आत्तापर्यंत 7 सुवर्णपदके मिळाली आहेत. यात नेमबाजी आणि कुस्तीत प्रत्येकी दोन तर टेनिस, रोइंग आणि शॉटपुट (अॅथलेटिक्स) मध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: सौरव घोसालने भारताला मिळवून दिले स्क्वॅशमधील तिसरे कांस्यपदक
–पंड्या ब्रदर्स खेळणार २०१९ विश्वचषकात?
–एशियन गेम्स: भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच दोन कांस्यपदके