चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, भारतीय संघाचे नेतृत्व युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा करेल. आता या स्पर्धेसाठी वेळापत्रकाची घोषणा झाली असून भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळेल.
यावेळी प्रथमच एशियन गेम्समध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. 27 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. पिंगफेंग क्रिकेट ग्राउंड येथे हे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 13 संघ सहभागी होतील. यातील नऊ संघांना प्रत्येकी तीन असे तीन गटात विभाजित केले आहे. तर आयसीसी क्रमवारीनुसार भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश हे चार संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. तर साखळी फेरीतील चार अव्वल संघ त्यांच्याविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
भारतीय संघ स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना 3 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)
राखीव खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन
(Asian Games 2023 Cricket Schedule Annouced Team India Will Play In Quarter Finals)
हेही वाचा-
कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे
खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर?






