भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. सुवर्ण पदकाच्या सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही. तसेच, टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी असल्यामुळे अधिकाऱ्यांनी भारताला विजयी घोषित केले. तसेच, सुवर्ण पदक मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये पोहोचताच एकच जल्लोष केला. भारतीय खेळाडूंचा डान्स व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) हेदेखील दिसत आहेत. हे तिघेही ‘लहरा दो’ हे गाणे गाण्यासोबतच डान्स करत जल्लोष करताना दिसत आहेत. यादरम्यान खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंदा पाहण्यासारखा होता.
हा व्हिडिओ शेअर करत बिश्नोईने कॅप्शनमध्ये “अनफिल्टर भावना” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/reel/CyGZQyPPerL/
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर पावसामुळे अंतिम सामना एक तास उशिराने सुरू झाला होता. यानंतर अफगाणिस्तान संघ 18.2 षटकात 5 विकेट्स गमावत 112 धावांवर खेळत होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यानंतर निश्चित वेळेनुसार सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे क्रमवारीच्या आधारे भारतीय संघाला विजयी घोषित केले गेले. अफगाणिस्तान संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच, पाकिस्तान संघाला पराभूत करत बांगलादेश संघाने कांस्य पदक आपल्या नावावर करण्यात यश मिळवले.
भारताच्या महिला संघाचीही ‘सुवर्ण’ कामगिरी
यापूर्वी महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावले होते. अशाप्रकारे भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकटे संघांनी एशियन गेम्स 2023मध्ये सुवर्ण पदक मिळवत इतिहास घडवला आहे. (asian games 2023 indian players avesh khan arshdeep singh ravi bishnoi dancing and celebrating after winning the gold medal video viral)
हेही वाचा-
इतिहास घडला, डिविलियर्सचा विक्रम तुटला! 21 वर्षीय फलंदाजाने ‘एवढ्या’ चेंडूत ठोकलं वेगवान शतक, लगेच वाचा
‘कुणीही धक्काबुक्की करणार नाही…’, रबाडाचे वडील बनले सेलिब्रिटी, फॅन्सची तुफान गर्दी; युजरची कमेंट चर्चेत