विश्वचषक 2023 येणाऱ्या 5 ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. सर्व क्रिकेट संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या विश्वचषाकाच्या 15 सद्सीय खेळाडूंच्या यादित मॅक्सवेलचे नाव आहे. आता विश्वचषक जवळ आला असताना मॅक्सवेलला झालेल्या दुखापतीचे दुख: मॅक्सवेल पेक्षा ऑस्ट्रेलियन संघाला होत आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. ते या ठिकाणी 5 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) टी20 मालिकेसाठी डर्बनमध्ये सराव करत होता. यादरम्यान तो जखमी झाला. आयसीसीच्या वेबसाइटवर प्रसारित झालेल्या बातमीनुसार, मॅक्सवेलला पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. मात्र, मॅक्सवेलला गंभीर दुखापत झालेली नाही, ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब आहे.
ऑस्ट्रेलियन संघचे निवडसमिती प्रमुख टोनी डोडेमेड यांनी मॅक्सवेलच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्सवेलबाबत संघ कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही, असे डोडेमेडचे मत आहे. ते म्हणाले, “आम्ही मॅक्सवेलच्या तब्बेतीवर लक्ष केंद्रित करू. आशा आहे की तो विश्वचषकापूर्वी भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल.”
मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 128 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 3490 धावा केल्या आहेत. वनडे प्रकारात मॅक्सवेलने 2 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. यासोबतच त्याने 60 विकेट घेतल्या आहेत. सोबतच ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2159 धावा केल्या आहेत. या प्रकारात त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. तसेच संगासाठी गोलंदाजी करत त्याने 39 विकेट घेतल्या आहेत.
विश्वचषक 2023 5 ऑक्टोंबर पासून सूरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंडविरुद्ध न्यूजीलंड असा होणार आहे. तर, भारतीय संघ 8 ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियन संघासोर असेल. भातीय संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ 14 ऑक्टोंबरला आमने- सामने असतील. (asutralian all rounder glenn maxwell is injured before world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजच्या दिग्गज कर्णधाराने गाईले विराटचे गुणगान! म्हणाला, तो खूप खास खेळाडू…
यूएस मास्टर्स टी10 फायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार! टेक्सास चार्जर्सने उंचावली ट्रॉफी