---Advertisement---

भारत की पाकिस्तान कोण जिंकणार आशिया चषक?, पाकिस्तानच्या रिजवानने दिले उत्तर

Mohammad Rizwan
---Advertisement---

अशिया चषक 2023 अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी तयारीला लागले आहेत. दरम्यान आशिया चषकात भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघासोबत आहे. हा सामना 2 सप्टेंबरला खेळाला जाणार आहे. या महासामन्यासाठी रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. अशातच पाकिस्तानचा यष्टीक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान याने मोठे वक्तव्य केले आहे.

मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत भारत की पाकिस्तान कोण विजयी होणार या प्रश्नावर उत्तर देत तो म्हणाला की, “भारत हा एक चांगला संघ आहे आणि पाकिस्तान देखील एक चांगला संघ आहे. भारत जेवढा ताकदवान आहे तेवढाच कमकुवतपणा आहे. तसेच आमच्याकडे देखील आहे.”

पाकिस्तानी यष्टीरक्षक पुढे म्हणाला की, “हा एक दबावाचा सामना आहे जो संपूर्ण जग पाहत असते. मला वाटते की, एक स्टार खेळाडू आणि नियमीत आंतरराष्ट्रीय खेळाडू यात अनुभवाचा फरक असतो. जो संघ दबाव झेलू शकतो तोच विजयी होऊ शकतो.”

https://www.instagram.com/reel/CwcrY8ctYMQ/?utm_source=ig_web_copy_link

श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघ पाकिस्तानला हरवू शकत नाही, असे नाही. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये खेळपट्टी आणि परिस्थितीपेक्षा कोणत्याही किंमतीवर सामना जिंकण्याचे दडपण नेहमीच असते. अशा परिस्थितीत जो संघ हा दबाव अधिक चांगल्या पद्धतीने सहन करू शकतो, तो सामना जिंकेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा वनडे सामना आसीसी विश्वचषक 2019 मध्ये झाला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावांची शतकी खेळी करत पाकिस्तानी गोलंदाजांना नाकिनव आणले होते. त्या सामन्यात भारताने 336 धावा केल्या होत्या आणि डकवर्थ लुईस पद्धतीमुळे पाकिस्तानचा संघ ८९ धावांनी पराभूत झाला होता. त्यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद होता आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. 4 वर्षांनंतर आशिया चषकात होणाऱ्या या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम तर रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. (pakistani player mohammad rizwan said who win in asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या-  
वेस्ट इंडिजच्या दिग्गज कर्णधाराने गाईले विराटचे गुणगान! म्हणाला, तो खूप खास खेळाडू…    
यूएस मास्टर्स टी10 फायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार! टेक्सास चार्जर्सने उंचावली ट्रॉफी

 

Arch Rivals Pakistan Cricket Team Asia cup 2023 Asia Cup 2023 News Indian Cricket Team Indians For Asia Cup cricket team Mohammad Rizwan Mohammad Rizwan 1st Mohammad rizwan batting Mohammad Rizwan News Mohammad Rizwan Pakistan Wicketkeeper Mohammad Rizwan Statement Mohammad Rizwan Video Mohammad Rizwan vs India Pakistan Cricket Team Pakistan Cricket Team News pakistan cricket team pakistan cricket board अशिया चषक 2023 अशिया चषक 2023 बातम्या आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघ पाकिस्तान क्रिकेट संघ पाकिस्तान क्रिकेट संघ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तान क्रिकेट संघ बातम्या भारतीय क्रिकेट संघ मोहम्मद रिजवान पहिल्या स्थानावर मोहम्मद रिजवान पाकिस्तानी यष्टिरक्षक मोहम्मद रिजवान बातम्या मोहम्मद रिजवान वक्तव्य मोहम्मद रिजवान विरुद्ध भारत मोहम्मद रिजवान व्हिडिओ मोहम्मद रिजवान. मोहम्मद रिजवानची फलंदाजी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---